शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

'२५०० कोटींचे टेंडर अन् इंजिनिअर्सचं राजकारण!' PWD घोटाळ्यावर अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:48 IST

PWD मध्ये २५०० कोटींचा टेंडर घोटाळा? अंबादास दानवेंची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने (ठाकरे गट) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही, मात्र कोणाला आम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर तो आम्ही स्वीकारू," अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी शिवसेनेची निर्णायक भूमिका मांडली. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय समीकरणांसह प्रशासकीय भ्रष्टाचारावर कडक ताशेरे ओढले.

सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) अभियंते राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. २५०० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या टेंडरमध्ये तांत्रिक त्रुटी असून यामुळे राज्याचे नुकसान होत आहे. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मंत्रालयात एक मोठी भ्रष्ट साखळी कार्यरत असून फूड अँड ड्रग्स विभागातही हस्तक्षेप वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार उपोषणाला बसणार?राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत असली तरी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका दानवे यांनी मांडली. सरकार फक्त घोषणा करते पण अंमलबजावणी शून्य आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी पक्षाचे आमदार उपोषणाला बसण्याचे संकेतही त्यांनी दिले.

महापालिकेतील टँकर घोटाळ्यावर प्रहारप्रशासकीय कालावधीत महानगरपालिकेत टँकर व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या व्यवहाराचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी करत त्यांनी नवनिर्वाचित महापौरांना संधी देण्याचे आवाहन केले. "नवे महापौर चांगले काम करतील, असा आम्हाला विश्वास आहे," असेही ते म्हणाले.

इतर महत्त्वाचे मुद्दे:

वनविभाग: वनविभाग हे आता दलालांचे केंद्र बनले असून गणेश नाईक यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घ्यावी.

रोहित पवार: रोहित पवार यांनी मांडलेल्या शंकांची चौकशी झाली पाहिजे, या विषयावर अजित पवार गटाचे नेते गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टिपू सुलतान वाद: टिपू सुलतान हे महापुरुष नव्हते, मग त्यांचा फोटो कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मालेगाव प्रकरणावर भाष्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : 2500 Crore Tender: Ambadas Danve Exposes PWD Corruption, Engineer Politics!

Web Summary : Ambadas Danve alleges PWD engineer corruption in 2500 crore tender. He demands judicial inquiry into irregularities, farmer loan waiver, tanker scam audit. He criticizes the forest department and Tipu Sultan glorification.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर