Video : म्हणून शिवसेना आमदाराने रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, पोलीसही धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 09:33 IST2021-06-29T04:05:36+5:302021-06-29T09:33:31+5:30

औरंगाबाद - सोमवारपासून दुपारी चारनंतर बाजारपेठ बंद होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकताच नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. दुपारी अडीच ...

Ambadas Danve breaks traffic jam and gives 'prasad' to rickshaw puller | Video : म्हणून शिवसेना आमदाराने रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, पोलीसही धावले

Video : म्हणून शिवसेना आमदाराने रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, पोलीसही धावले

औरंगाबाद - सोमवारपासून दुपारी चारनंतर बाजारपेठ बंद होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकताच नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास जालना रोडवर दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे वाहतूक मंदावली होती. क्रांतिचौकात वाहतूक शाखेच्या हवालदार सुजाता खरात आणि अन्य एक हवालदार वाहतूक नियमन करीत होते. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहनचालक हॉर्न वाजवित होते.

क्रांतिचौकाच्या चारही रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचवेळी तेथून जाणारे आ. दानवे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेत वाहतूक नियमन सुरू केले. दरम्यान, याचवेळी एक रिक्षाचालक नियम मोडून सुसाट जाऊ लागला. तेव्हा दानवे आणि कार्यकर्त्यांनी रिक्षा रोखली. सर्व वाहनचालक सिग्नलवर उभे असताना तू असा कसा निघाला, असे विचारत त्यांनी त्याच्या कानशिलात लगावली. यावेळी त्याने काहीतरी कारण सांगितले. त्याच्यामुळे पुन्हा वाहतूक खोळंबण्याची शक्यता पाहून त्यांनी यापुढे नियमभंग करू नको, असे बजावत त्याला जाऊ दिले. काही वेळात चौकातील वाहतूक सुरळीत सुरू झाली.

Web Title: Ambadas Danve breaks traffic jam and gives 'prasad' to rickshaw puller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.