शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बॅण्डपथकाची पदेही भरा, आमची उंची थोडी कमी, पण पोलीस दलात भरती व्हायचे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 12:18 IST

आमचे वय सरतेय, संधी द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे 

औरंगाबाद : पोलीस व्हायचं ध्येय आहे. उंची २ सेंमी.ने कमी आहे. त्यामुळे बॅण्डपथकातून तरी पोलीस दलात एन्ट्री होईल, असे वाटत होते. म्हणून पाच वर्षांपासून तयारी करतोय. आतापर्यंत एकच भरती झाली. वय सरतेय. या मेगाभरतीत तरी एकही जागा बॅण्डपथकाला नाही. वय निघून गेले तर कसे होईल, असा सवाल पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी करत आहेत.

२०२१-२२ मध्ये निघालेल्या पोलीस भरतीत हजारो पदे भरली जाणार आहेत. मात्र, आम्ही बॅण्ड पथकासाठी शहरात राहून तयारी केली. त्या पदाच्या एकही जागा भरल्या जाणार नसल्याने भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या परिस्थितीचा आणि बॅण्ड पथकातील रिक्त जागांचा विचार सहानुभूतीने करा आणि आम्हाला भरतीची संधी उपलब्ध करून द्या, म्हणून पोलीस बॅण्ड भरतीची मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, विरोधी पक्षनेते, मंत्र्यांनाही निवेदने दिली. आता गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी विद्यार्थी मुंबईला रवाना होत आहेत. मागणी एकच आहे. अडीच सेंटिमीटर उंचीत सूट देणाऱ्या पोलीस बॅण्डच्या पदांची भरती करा आणि कमी उंचीच्या विद्यार्थ्यांनाही रोजगाराची संधी द्या. शरद घोरपडे, अदिल शेख, भास्कर शेवाळे, राहुल वाघ, आनंद दाभाडे हे वेगवेगळ्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसह भाग्यश्री नरवडे, रंजना तायडे, सरिता सरदार, मानसी अन्नपुरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना निवेदने देत मागणी केली आहे.

आता तरी पदे भरापाच वर्षांपासून बॅण्डभरतीची तयारी करतोय. माझी उंची दोन सेंमीने कमी असल्याने हाच एकमेव पर्याय आहे. पाच वर्षांत एकच भरती झाली. त्यातही दोनच पदे होती. त्यामुळे स्वप्न पूर्ण झाले नाही. तयारीला दरमहा पाच हजार रुपयांपर्यंत खर्च येतोय. वय सरत आहे. शेवटची २ वर्षे शिल्लक राहिली. आता तरी पदे भरा, हीच शासनाकडे मागणी आहे. हे राज्यव्यापी आंदोलन आहे.-शरद घोरपडे, भरती तयारी करणारा विद्यार्थी

टॅग्स :PoliceपोलिसEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद