अलॉफ्ट लायमर, फ्युचर स्टार क्रिकेट अकॅडमी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:50 IST2017-12-07T00:50:46+5:302017-12-07T00:50:56+5:30

एमजीएम टी-२० क्रिकेट स्पर्धेत अलॉफ्ट लायमर व फ्युचर स्टार क्रिकेट अकॅडमीचा संघ विजयी ठरला. पहिल्या सामन्यात अलॉफ्ट लायमरने २० षटकांत ५ बाद १२१ धावा केल्या.

Aloft Lymere, Future Star Cricket Academy won | अलॉफ्ट लायमर, फ्युचर स्टार क्रिकेट अकॅडमी विजयी

अलॉफ्ट लायमर, फ्युचर स्टार क्रिकेट अकॅडमी विजयी

ठळक मुद्दे सय्यद जावेद, वैभव पाटील सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम टी-२० क्रिकेट स्पर्धेत अलॉफ्ट लायमर व फ्युचर स्टार क्रिकेट अकॅडमीचा संघ विजयी ठरला.
पहिल्या सामन्यात अलॉफ्ट लायमरने २० षटकांत ५ बाद १२१ धावा केल्या. त्यांच्याकडून सय्यद जावेदने ३ षटकार व ३ चौकारांसह नाबाद ४३ व अब्दुल कय्युमने २९ धावा केल्या. फ्रेण्डस् सी.सी.कडून ऋषिकेश नायर व सुशील गणोरकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात फ्रेण्डस् सी.सी. ५६ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून सचिन हातोळेने १९ व अशोक शिंदेने १४ धावा केल्या. अलॉफ्ट लायमरकडून मोहंमद इम्रान आणि सुशील अरक यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. दुपारच्या सत्रात स्टार अकॅडमी, मुंबईने सर्वबाद ११८ धावा केल्या. त्यांच्याकडून एहसान जमालने ३० व वैभव पाटीलने ३६ धावा केल्या. बार्शी संघाकडून सागर नेरलेकर, विशाल गुगळे व सतीश आगलावे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात बार्शी संघ ६५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून किरण बोरकरने १८ धावा केल्या. मुंबईकडून प्रमोद वाघने ३ व वैभव पाटीलने २ गडी बाद केले.

 

Web Title: Aloft Lymere, Future Star Cricket Academy won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.