शिक्षकांना घरून कामाची मुभा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:05 IST2021-04-10T04:05:01+5:302021-04-10T04:05:01+5:30
पहिली ते आठवीच्या सर्व मुलांना परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांना ...

शिक्षकांना घरून कामाची मुभा द्या
पहिली ते आठवीच्या सर्व मुलांना परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्र काढले आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत अनेक शिक्षक कोरोना प्रतिबंधाच्या कामात कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील जवळपास १० पेक्षा अधिक शिक्षक कोरोनामुळे मृत्यू पावले. या परिस्थितीत शिक्षकांना दररोज शाळेत बोलावणे उचित ठरणार नाही. विद्यार्थीदेखील शाळेत येत नाहीत, म्हणून मुलांना ऑनलाइन पद्धतीनेच अभ्यास देणे सुरू आहे. बहुतांश काम ऑनलाइन करणे शक्य असताना अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच शिक्षकांना शाळेत बोलवावे. सर्व परिस्थितीचा विचार करून शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा शासनाने द्यावी, अशी मागणी निवेदनात जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रणजित राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत आदींनी केली आहे.