पीक कर्जाचे संथगतीनेच वाटप
By Admin | Updated: August 21, 2014 01:19 IST2014-08-21T00:52:43+5:302014-08-21T01:19:18+5:30
जालना : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्ज वाटप करण्यासाठी ७९७ कोटी रुपयांचे उद्दिष्टे असले तरी विविध बँकांनी अद्यापही फक्त ४९१ कोटी ५० लाख रूपयाचे वाटप केले आहे.

पीक कर्जाचे संथगतीनेच वाटप
जालना : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्ज वाटप करण्यासाठी ७९७ कोटी रुपयांचे उद्दिष्टे असले तरी विविध बँकांनी अद्यापही फक्त ४९१ कोटी ५० लाख रूपयाचे वाटप केले आहे. त्याची सरासरी ६२ टक्के एवढी आहे.
जिल्ह्यात अद्याप एकही नदी - नाल्याला पूर जाईल, असा पाऊस झाला नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्ज देण्यात येत आहे. परंतु बँकांच्या अडेलवृत्तीमुळे आणि उदसिनतेमुळे अद्यापही जिल्हात पीककर्ज देण्याला म्हणावी तशी गती आली नाही. पीक कर्जासंदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्याची पालकमंत्र्यांनी दखल घेत शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज देण्यात यावे, अशा बँकाना सूचना केल्या. परंतु अद्यापही कर्जाची गती पुढे सरकत नसल्याने शेतकरी दररोज बँकांचे खेटे मारत असल्याचे चित्र आहे.
सर्व बँकाना पिककर्जाची गती वाढविण्यासाठी सांगण्यात आले आहे.
येत्या महिन्याभरात संपूर्ण उद्दिष्टाच्या जास्त पिककर्ज वाटप करण्याचे आमचे उद्दिष्टे असल्याचे अग्रणी बँकेचे उपव्यवस्थापक महेश बोरूडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
या जिल्ह्यातील खाजगी बॅँकांनी आतापर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांना २१ कोटी ६० लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना २२ कोटी १५ लाख एवढे पीक कर्जाचे वितरण केले आहे. त्याची टक्केवारी १०३ टक्के एवढी आहे. त्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती बॅँक पिछाडीवर आहे. या बॅँकेस यावर्षी १२० कोटी ८० लाख रुपयांच्या पीक कर्जांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु या बॅँकेने केवळ ६७ कोटी १ लाख रुपयांचेच पीक कर्ज वितरीत केले असल्याची माहिती बॅँकेच्या सूत्रांनी दिली.
४दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या या संथ गतीने सुरु असणाऱ्या पीक कर्जाच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले असताना शेतकऱ्यांचा आर्थिक कना ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बॅँकेकडून पीक कर्जाचे मुदतीच्या आतच वितरण पूर्ण होईल, असे अपेक्षित होते.