शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

एक मराठा लाख मराठा! आक्रमक आंदोलकांनी थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:15 IST

सरकारने मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आमचा देखील एन्काउंटर करा, असे आव्हान आंदोलकांनी केले

छत्रपती संभाजीनगर/फुलंब्री: मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांची खुर्ची बाहेर काढून आवारातच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत दोघांनी जाळल्याची घटना आज, मंगळवारी ( दि. २४ ) सकाळी घडली. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. जरांगे यांची तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. सरकारकडून मागण्या पूर्ण होत नाहीत आणि जरांगे यांची तब्येत खालवल्याने मराठा समाजात असंतोष आहे. अनेक जिल्ह्यात बंद पाळून सरकारचा निषेध करण्यात आला. यातच फुलंब्री येथे मराठा आंदोलक मंगेश साबळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात आज सकाळी आंदोलन करण्यात आले. साबळे आणि इतर एकाने थेट तहसीलदार यांच्या दालनातून त्यांची खर्ची बाहर आणत तहसील कार्यालय परिसरात पेट्रोल टाकून खुर्ची पेटविण्यात आली. 

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे हे आपल्या दोन सहकारी सोबत सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयात आले. तहसीलदार यांच्या दालनात कोणी नसल्याने त्यांनी खुर्ची बाहेर काढली. इमारतीच्या समोर पेट्रोल टाकून खुर्ची पेटवून दिली. त्यांनी एक मराठा लाख मराठा आशा घोषणाबाजी केली. अचानक ही घटना घडली यावेळी काही कर्मचारी तिथे उपस्थित होते. त्यांनी काही विरोध केला नाही. त्यानंतर काही वेळात मंगेश साबळे आपल्या सहकार्य सोबत निघून गेले.

गुन्हा दाखल करण्यात येणार जातवा येथील तरुणाने सोमवारी मराठा आरक्षण करीत आत्महत्या केली होती त्या संदर्भात घाटी रुग्णालयात गेलो होतो तहसील कार्यालयात खुर्ची जाळण्याची माहिती मिळाली असती तात्काळ पोहचलो या संदर्भात संबंधित लोका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती तहसीलदार डॉ. कृष्णा काणगुले यांनी दिली

आमचे एन्काउंटर करासरकारने मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे यांचा बळी देयचा आहे, असा आरोप करत आमचा देखील एन्काउंटर करावे, असे आव्हान खुर्ची पेटवल्यानंतर आंदोलकांनी केले. दरम्यान, मराठा आरक्षण विषयी सरकार दखल घेत नाही म्हणून तहसीलदारची खुर्ची पेटवून निषेध केला, अशी प्रतिक्रिया सरपंच मंगेश साबळे यांनी दिली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादTahasildarतहसीलदारState Governmentराज्य सरकार