शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

डीपीडीसीनेही दुर्लक्ष केल्याचा आरोप

By admin | Updated: July 1, 2014 00:37 IST

श्रीक्षेत्र माहूर: नेतेमंडळी व अधिकाऱ्यांचे तालुक्याकडे कायम दुर्लक्ष झाल्याने तालुका आजपर्यंत विकासात्मक बाबीत मागासलेला राहिला़ त्यात जिल्हा नियोजन समितीने शहरातील विकासात्मक

श्रीक्षेत्र माहूर: नेतेमंडळी व अधिकाऱ्यांचे तालुक्याकडे कायम दुर्लक्ष झाल्याने तालुका आजपर्यंत विकासात्मक बाबीत मागासलेला राहिला़ त्यात जिल्हा नियोजन समितीने शहरातील विकासात्मक कामांबाबत दखल न घेतल्याने तालुक्याच्या मागासलेपणात भर पडत आहे़शहरात वर्षभरात कोट्यवधी भाविक भक्त पर्यटकांची सतत वर्दळ असते़ तालुक्यात व शहरात एकमेव असलेल्या बसस्थानकात पाच एकर जागा असूनही दर्शनी भागात शॉपिंग कॉम्प्लेक्स, अद्ययावत बसस्थानक, प्रतीक्षालय इत्यादी सुविधा देण्याची अनेक वर्षापासूनच्या मागणीला आदिवासी उपाय योजनेतून ५० लाख रुपये सुशोभिकरणातून देवून बोळवण करण्यात आली आहे़ तसेच येथील म़रा़ वि़म़ कंपनी कार्यालयाकडेही ६ एकर जागा आहे़ या कार्यालयाच्या दर्शनी भागात रेणुका देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून मोठी जागा शिल्लक असल्याने येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स, कर्मचारी निवासस्ािने अद्ययावत कार्यालय तसेच प्रवासी निवारा बांधून देण्याचीही मागणी फार जुनी असूनही याकडे जिल्हा नियोजन समितीने सतत दुर्लक्ष केले़ तालुक्यात आदिवासी व बंजारा समाजाचे प्रमाण जास्त असूनही आदिवासींच्या मुलामुलींच्या शिक्षण रोजगारासाठी एकही शाळा, वसतिगृह किंवा उद्योग प्रशिक्षण यासाठी आजपर्यंत एकही इमारत सुद्धा बांधण्यात आली नाही़ तसेच बंजारा समाजाच्या मुला-मुलींसाठी एकही वसतिगृह किंवा उद्योगासाठी प्रशिक्षणकेंद्र सुरू करण्यात आलेले नाही़माजी मुख्यमंत्री तथा खा़ अशोकराव चव्हाण हे जिल्ह्याचे खरे भूमिपूत्र व येथील देवस्थानाबद्दल आस्था तर परिसरातील जनतेच्या समस्या समजून घेणारे दूरदृष्टी असणारे लोकनेते असल्याने त्यांनी तीर्थक्षेत्र माहूरच्या विकासासाठी ७९ कोटी रुपयांचा निधी तर शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिल्याने शहरास तीर्थक्षेत्राला साजेशे रूपय येत असून इतर समस्यांविषयी तालुक्यातील नेते पदाधिकारी पाठपुरावा करू शकत नसल्याने नेते, पदाधिकाऱ्यांविषयी जनतेतून प्रचंड नाराजी होत आहे़ (वार्ताहर)महत्त्वाचे म्हणजे येथे मृत्यूशय्येवर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय मंजूर होवूनही कुठलीच हालचाल झाली नाही़ महिनाभरात १०० पेक्षा जास्त अपघातांची नोंद होवूनही व गेल्या १० वर्षांपासून येथे ट्रॉमा केअर सेंटरची मागणी असताना अद्यापपर्यंत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याविषयी कुणीही आवाज उठविलेला नाही़ त्यामुळे शेकडो अपघातग्रस्त नागरिकांना जीव गमवावा लागलेला आहे़