शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीतून वगळल्याचा आरोप

By admin | Updated: February 9, 2015 00:45 IST

लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेच्या मतदार यादीतून अनेक मतदारांना वगळल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती सपना घुगे-पाटील यांनी केला असून, वगळण्यात आलेल्या मतदारांना यादीत पुन्हा स्थान द्यावे, या मागणीसाठी त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर रविवारी ठिय्या मांडला होता. साकोळच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मतदार यादीतून अचानक तीनशे लोकांना वगळण्यात आले असून, ३०० नवीन लोकांना मतदार यादीत स्थान दिले आहे, असा आरोप आरोग्य सभापतींनी केला आहे. मात्र प्रशासनाने त्यांचा आरोप फेटाळून लावला असून, मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात नोंदविलेले आक्षेपच बोगस असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, आरोग्य सभापती सपनाताई घुगे-पाटील, राजकुमार घुगे-पाटील, विलास रामशेट्टे, रमेश लुल्ले, अरुण शेटकार, संजय भुरे, गुंडेराव भुरे, अ‍ॅड. सुरेश पाटील, कालिदास माने आदींनी मतदार यादीतून वगळल्याचा आरोप केला. प्रशासकीय इमारतीतील उपनिबंधक कार्यालयासमोर साकोळ येथील ग्रामस्थांनी दोन तास आंदोलन केले. मतदार यादीतून कसे वगळले आणि नवीन लोकांना कसे घेतले? विशेष म्हणजे मतदारयादीत समाविष्ट केलेल्या १३० मतदारांकडे जमीनही नाही, त्यांचा समावेश कसा केला, असा सवाल सपनाताई घुगे- पाटील यांनी केला. आमच्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात यावी व मतदार यादीमध्ये स्थान देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. १३ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्या यादीत वगळलेल्या लोकांची नावे घेण्यात यावीत, असेही आक्षेपकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)आलेल्या ११० आक्षेपांपैकी मतदार यादीत समाविष्ट करण्यास तिघे पात्र आहेत. जे आक्षेप आहेत, ते बोगस आहेत. काही मयत व्यक्तींचीही त्यात नावे आहेत. आक्षेपावरील सह्या बोगस आहेत, असे उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील गजेंद्र देशमुख यांनी सांगितले.