शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवर अत्याचाराचा कांगावा अन् पतीसाठी रचलेला डाव महिलेवरच उलटला, तिघींवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 13:18 IST

शहानिशा न करता चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा कांगावा; अतिउत्साही सामाजिक कार्यकर्तीने पोलिसांची उडवली झोप

वाळूज महानगर : कुठलीही शहानिशा न करता एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा कांगावा सोशल मीडियावर करून अतिउत्साही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांना कामाला लावले. या संवेदनशील प्रकरणामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे समजले.

सामाजिक कार्यकर्त्या बाईंनी गुरुवारी सायंकाळी सोशल मीडियावर टाकलेल्या मेसेजमध्ये आंबेलोहळ परिसरातील एका महिलेच्या आठवर्षीय नातीवर तिचा आजोबा लैंगिक अत्याचार करतो. त्यातून या चिमुकलीच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक स्वाती उचित, पो. कॉ. अविनाश ढगे यांना क्रांती चौकात थांबलेल्या चिमुकलीच्या नातलग तक्रारदार महिलेकडे रवाना केले. 

पोलिस पथकाने क्रांती चौकात जाऊन तक्रारदार महिला व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लता जाधव यांच्याकडे चौकशी केली असता आठवर्षीय चिमुकली १७ एप्रिल रोजी हरविली असून तिच्या चुलत आजोबांनीच तिला उचलून नेल्याचे सांगितले. चिमुकलीवर आजोबाने अत्याचार केला असून चिमुकलीचा शोध लागत नसून तिचे बरे-वाईट झाल्याचा संशय व्यक्त करीत डॉ. लता जाधव यांनी पोलिस ढिम्म असल्याचा आरोप केला. जाधव यांनी पोलिस पथकासोबत अरेरावी केली.

पतीला अडकविण्यासाठी खोटी तक्रारनंतर पोलिस पथक अंबेलोहळला गेले. त्यांना चिमुकली तिच्या चुलत आजोबांसोबत हसत-खेळत असल्याचे दिसले. तक्रारदार महिला ही या आजोबांची दुसरी पत्नी असून, त्या चिमुकलीचे आई-वडील एका गुन्ह्यात कारागृहात आहेत. तक्रारदार महिला चिमुकलीला भीक मागायला लावत होती म्हणून आजोबांनी तिला स्वत:कडे ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. रात्रीच पोलिसांनी चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करवली असता तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे उघड झाले. घरगुती वादातून पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी महिलेने कट रचल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

पोलिसांना कामाला लावणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हासामाजिक कार्यकर्त्या लता जाधव व कौशल्या गाढे यांनी शहानिशा न करता खोटा संदेश व्हायरल केला. उपनिरीक्षक स्वाती राऊत यांच्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लता जाधव, कौशल्या गाडे व तक्रारदार महिला या तिघींविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादSexual abuseलैंगिक शोषण