पीक विमा वाटपात खुलताबाद तालुक्यावर अन्याय झाल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:05 IST2021-05-28T04:05:22+5:302021-05-28T04:05:22+5:30
निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी बांधवांना पीक विमा देताना मोठ्या प्रमाणावर हेवेदावे केले गेले आहेत. तालुक्यात अतिवृष्टी झाली म्हणून ...

पीक विमा वाटपात खुलताबाद तालुक्यावर अन्याय झाल्याचा आरोप
निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी बांधवांना पीक विमा देताना मोठ्या प्रमाणावर हेवेदावे केले गेले आहेत. तालुक्यात अतिवृष्टी झाली म्हणून सरसकट पीक विमा मंजूर व्हायला पाहिजे होता; परंतु तसे न होता कापूस पिकासाठी बाजार सावंगी मंडळ वगळता एकाही मंडळाला खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर झालेला नाही. पीक कापणी प्रयोग, उंबरठा उत्पन्न व अतिवृष्टीच्या नोंदीवरून पीक विमा मंजूर होणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने विरोधी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विमा मंजूर केला नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. याबाबत चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी तहसीलदार सुरेंद्र देशमुख व तालुका कृषी अधिकारी विजय नरवडे यांच्याकडे करण्यात आली. निवेदन देताना पं. स. सभापती गणेश आधाने, उपसभापती युवराज ठेंगडे, प्रकाश वाकळे, प्रभाकर शिंदे, प्रकाश पाटील, सतीश दांडेकर, परसराम बारगळ, दिनेश अंभोरे, अविनाश कुलकर्णी, राहुल निकुंभ आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
फोटो :