शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सर्व जलकुंभ कोरडे

By admin | Updated: September 17, 2014 01:16 IST

औरंगाबाद : सणासुदीत शहर १५ सप्टेंबरपासून निर्जळीचा सामना करीत आहे. मंगळवारी शहरातील एकाही जलकुंभात पाणी नव्हते.

औरंगाबाद : सणासुदीत शहर १५ सप्टेंबरपासून निर्जळीचा सामना करीत आहे. मंगळवारी शहरातील एकाही जलकुंभात पाणी नव्हते. सर्व जलकुंभ कोरडे पडल्यामुळे गुंठेवारी वसाहतींमध्ये टँकरने होणारा पाणीपुरवठा झाला नाही. सिडको, हडकोसह शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली.पालिकेने या प्रकरणी काहीही माहिती पुरविली नाही, तर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दिलेल्या माहितीत कुठलीही एकवाक्यता नव्हती. कंपनीच्या तांत्रिक आणि प्रशासकीय विभागात समन्वय नसल्याचे समोर आले असून, आज नागरिकांना महागडे टँकर घेऊन पाण्याची गरज भागवावी लागली. १ दिवसाचे शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीही जलवाहिन्यांच्या गळत्यांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे शहरात जायकवाडीतून पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी, सर्व जलकुंभ कोरडेठाक पडले होते. कोटला कॉलनी, क्रांतीचौक, एन-५, एन-६ येथील पम्पिंग स्टेशनवर टँकरने पाणी भरण्याची सुविधा आहे. मात्र, जलकुंभात पाणीच आले नसल्यामुळे टँकर तेथेच उभे होते.कंपनीत समन्वय नसल्यामुळे शहरात पाण्याची बोंबाबोंब झाली. जायकवाडी सबस्टेशन, जायकवाडी नवीन व जुन्या योजनेचे तसेच ढोरकीन, फारोळा येथे पंप दुरुस्ती, व्हॉल्व्हची दुरुस्ती व काही यांत्रिकी, विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी जलवाहिन्या कोरड्याच आहेत. रेल्वेस्टेशन ते ज्युबिली पार्कपर्यंत टाकण्यात आलेली ३८ कोटींची जलवाहिनी उद्या जोडण्यात येईल. तांत्रिक अभियंत्यांनी पाणीपुरवठा कधी होणार, या प्रकरणी काहीही स्पष्ट केले नाही. जायकवाडी ते शहरादरम्यान या जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या गळत्या आहेत. त्यांची दुरुस्ती अजून सुरू असल्याचे कंपनी सूत्रांनी सांगितले.नळांना पाणी आलेच नाही. शिवाय गुंठेवारी वसाहतींमधील टँकरही आज बंद होते. कं पनीचे अभियंता कोण आहेत, ते कुठे बसतात, याची कुठलीही माहिती नागरिकांना नसल्यामुळे ते जलकुंभावर हेलपाटे मारून वैतागून निघून गेले. नागरिकांना महागडे टँकर घेऊन पाण्याची गरज भागवावी लागली. कंपनी आणि पालिका यांच्यात कोणतीही सुसूत्रता नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. फारोळा येथे केलेली जोडणी निखळली. एकीकडे कंपनीचा जनसंपर्क विभाग कामे झाल्याचे जाहीर करतो आहे, तर दुसरीकडे तांत्रिक विभाग अजूनही डागडुजीचे काम करीत आहे.