मद्यपी दोन वाहनचालकांना पकडले
By Admin | Updated: December 28, 2015 00:19 IST2015-12-28T00:11:50+5:302015-12-28T00:19:08+5:30
लातूर : दारुच्या नशेत वाहन चालविणाऱ्यावर पोलिसांनी नजर ठेवली असून, ब्रेथ अनालायझरद्वारे संशयित वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे़

मद्यपी दोन वाहनचालकांना पकडले
लातूर : दारुच्या नशेत वाहन चालविणाऱ्यावर पोलिसांनी नजर ठेवली असून, ब्रेथ अनालायझरद्वारे संशयित वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे़ गांधी चौक आणि एमआयडीसी पोलिसांनी दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत़
एमआयडीसी परिसरात अनियंत्रित वाहन चालविताना शिवा मारुती डोळसे (रा़सामनगाव) तर बार्शी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर सुभाष जगन्नाथ गोरे (रा़प्रकाश नगर) या दोघांना पोलिसांनी पकडले़ ब्रेथ अनालायझर मशीनमध्ये फुंकर घालण्यास सांगितले असता, त्यांच्या शरिरात १३८ एमई/१०० एमएल मादक पदार्थ आढळून आले़ म्हणून या दोघांविरुद्ध सहाय्यक पोलिस निरिक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आलाा आहे़ गांधी चौक पोलिसांनी गांधी चौक येथे दारु पिवून वाहन चालवित असताना गणेश शिवाजी वाघमारे (रा़आर्वी रोड) यास पकडले़ त्याच्या विरुद्ध पोहेकॉ मुनवरखाँ तैमुरखाँ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ गेल्या आठवड्यापासून मद्यपी वाहकांवर पोलिसांची नजर आहे़ संशय आलेल्या वाहनचालकाची अनालायझरद्वारे तपासणी करण्यात येत आहे़