शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

अख्खे गाव लागले देशोधडीला!

By admin | Updated: July 19, 2014 01:22 IST

विनोद काकडे, औरंगाबाद एक मिस्त्री, ज्याची दुचाकी घेण्याची ऐपत नव्हती तो ‘केबीसी’मुळे आलिशान चारचाकीत फिरू लागला, फॉरेनच्या ट्रीपला जाऊ लागला...

विनोद काकडे, औरंगाबादएक मिस्त्री, ज्याची दुचाकी घेण्याची ऐपत नव्हती तो ‘केबीसी’मुळे आलिशान चारचाकीत फिरू लागला, फॉरेनच्या ट्रीपला जाऊ लागला... तो हे करु शकतो तर आपण का नाही? या विचारातून एकेक करून अख्खे गाव केबीसीच्या जाळ्यात अडकले. कुणी शेती, कुणी दागिने विकून गुंतवणूक केली, तर कुणी गुंतवणुकीसाठी इतर मालमत्ता सावकाराकडे गहाण ठेवली. केसीबीने गाशा गुंडाळल्याने हे अख्खे गाव देशोधडीला लागले. स्वत: तर बरबाद झालेच झाले आपल्याबरोबर हजारो मित्र, नातेवाईकांनाही या गावकऱ्यांनी केबीसीच्या नादी लावून देशोधडीला लावले. पैठण तालुक्यातील मावसगव्हाण. औरंगाबादपासून ३५ किलोमीटर अंतरावर आडवळणीला असलेले दीडशे उंबऱ्यांचे हे गाव. जायकवाडी धरण जवळच असल्यामुळे गाव तसे सधनच. शेती हेच बहुतांश कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन. सर्व काही सुरळीत होते. दोन वर्षांपूर्वी गावातील सुरेश संपत जाधव हा ‘केबीसी’ची स्कीम घेऊन गावात आला. सुरेश हा पाटबंधारे खात्यात सरकारी नोकरीला आहे. मिस्त्रीच्या चारचाकीने घातली भुरळ!गावातील सोपान जाधव हे मिस्त्री काम करायचे. त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. सुरेशने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून त्यांनी दोन वर्षांपूर्वी केबीसीमध्ये ७७ हजार रुपये गुंतविले. आणखी काही नातेवाईकांना मेंबर बनविले. त्यामुळे त्यांना केबीसीकडून ६० हजार रुपये कमिशन मिळाले. ही रक्कम वाढतच गेली. काही महिन्यांतच त्यांनी आलिशान कार खरेदी केली. मिस्त्रीचा व्यवसाय सोडून त्यांनी तब्बल साडेतीन हजार मेंबर गोळा केला. त्यामुळे कंपनीकडून त्यांना सिंगापूर, मलेशिया या ट्रीपवर पाठविण्यात आले. जाधव यांची काही महिन्यांतच झालेली प्रगती पाहून गावकऱ्यांना भुरळच पडली.चिंता अन् स्मशान शांतता‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी या गावाला भेट दिली. तेव्हा अख्खे गाव मंदिराच्या पारावर जमा झाले होते. गावात स्मशान शांतता पसरली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच चिंता आणि तणाव दिसून येत होता. आपले पैसे तर गेले; परंतु ज्या नातेवाईकांनी, मित्रांनी गुंतवणूक केली, त्यांचे पैसे परत द्यायचे कसे? गुंतवणुकीसाठी सगळं काही गहाण ठेवले, विकले. आता घर कसे चालवायचे? प्रत्येकासमोर हाच प्रश्न होता.७० कोटींची गुंतवणूकया छोट्याशा गावातून केबीसीत सुमारे ७० कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यात गावकऱ्यांचा वाटा २० कोटींचा, तर नातेवाईक व मित्रांचा वाटा ५० कोटींचा आहे. चारचाकींची जप्तीकेबीसीच्या सुरुवातीच्या मिळकतीवर गावातील सहा जणांनी आलिशान चारचाकी गाड्या घेतल्या होत्या. हप्ते थकल्याने बँकांनी आता जप्तीची मोहीम सुरू केली आहे.