अजिंठा पोलिसांनी पकडला सव्वा लाखांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:02 IST2021-06-27T04:02:17+5:302021-06-27T04:02:17+5:30

पोलीसांना सूत्रांकडून माहिती मिळाली की, अरुण धनवई हा शिवना गावात अवैधरित्या गुटखा विक्री करतो. त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक ...

Ajanta police seize gutka worth Rs 15 lakh | अजिंठा पोलिसांनी पकडला सव्वा लाखांचा गुटखा

अजिंठा पोलिसांनी पकडला सव्वा लाखांचा गुटखा

पोलीसांना सूत्रांकडून माहिती मिळाली की, अरुण धनवई हा शिवना गावात अवैधरित्या गुटखा विक्री करतो. त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर, फौजदार राजू राठोड, अक्रम पठाण, आबासाहेब आव्हाड, कौतिक चव्हाण, राजू बर्डे यांनी सापळा रचून धनवई यास अटक केले. तेव्हा त्याच्याकडील एक लाख लाख २१ हजाराचा गुटखा जप्त केला. तर या कामासाठी वापरला जाणारी कारदेखील जप्त करून २ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

---

चौकट

तीन हजारांचा गुटखा जप्त

सिल्लोड तालुक्यातील भवन बसस्थानकावर अवैधरित्या विक्रीसाठी जाणारा तीन हजारांचा गुटखा सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पकडला. याप्रकरणी शेख अब्दुल हमीद अब्दुल माजित (३५) यास अटक केली. ही कार्यवाही सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, पोलीस नाईक मंगेश राठोड यांनी केली.

Web Title: Ajanta police seize gutka worth Rs 15 lakh