राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्या ठेंगे हिचा सुवर्ण चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:08 IST2017-12-25T01:08:06+5:302017-12-25T01:08:43+5:30

औरंगाबादची प्रतिभावान नेमबाज ऐश्वर्या ठेंगे हिने तिरुअनंतपुरम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकांचा चौकार ठोकताना एकूण ५ पदकांची कमाई केली.

Aishwarya will be the gold medal in the National Shooting Championship | राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्या ठेंगे हिचा सुवर्ण चौकार

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्या ठेंगे हिचा सुवर्ण चौकार

औरंगाबाद : औरंगाबादची प्रतिभावान नेमबाज ऐश्वर्या ठेंगे हिने तिरुअनंतपुरम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकांचा चौकार ठोकताना एकूण ५ पदकांची कमाई केली.
ऐश्वर्या ठेंगे हिने वरिष्ठ व कनिष्ठ सिव्हिलियन गटात आणि कनिष्ठ सांघिक गटात अशी तीन सुवर्णपदके जिंकली. तसेच तिने ०.२२ थ्री पोझिशनमध्ये कनिष्ठ सिव्हिलियन गटात सुवर्ण आणि कनिष्ठ गटात सांघिक रौप्यपदकांची कमाई केली. महाराष्ट्राला ५ पदके जिंकून देणाºया सांघिक गटात औरंगाबादच्या ऐश्वर्या ठेंगे हिच्यासह यशिका शिंदे, वेदांगी, भक्ती खामकर यांचा समावेश होता. याआधी ऐश्वर्या ठेंगे हिने ६ रौप्य व ६ कास्य अशा १२ पदकांची कमाई केली होती. तिला मुख्य प्रशिक्षक प्रा. संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल तिचे एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, संघटनेचे अध्यक्ष पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपाध्यक्ष पी. व्ही. कुलकर्णी, अनंत बर्वे, हेमंत मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Aishwarya will be the gold medal in the National Shooting Championship