हुश्श... अखेर विमान झेपावले

By Admin | Updated: December 19, 2014 00:59 IST2014-12-19T00:07:39+5:302014-12-19T00:59:05+5:30

औरंगाबाद : सलग दोन दिवस स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने पुढील उड्डाणे रद्द होणार का याची धाकधूक प्रवाशांना लागली होती.

Aishwarya ... The plane jumped | हुश्श... अखेर विमान झेपावले

हुश्श... अखेर विमान झेपावले

औरंगाबाद : सलग दोन दिवस स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने पुढील उड्डाणे रद्द होणार का याची धाकधूक प्रवाशांना लागली होती. अखेर तिसऱ्या दिवशी स्पाईस जेटचे विमान आकाशात झेपावले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. केवळ ७० प्रवाशांना घेऊन विमान दिल्लीकडे रवाना झाले. यावरून दोन दिवसांच्या परिस्थितीमुळे स्पाईस जेटच्या प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
शिवाय स्पाईस जेटच्या दिल्लीला जाणाऱ्या विमानाची महिनाभराची बुकिंग असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान (क्रमांक : सीजी १७३) १६ डिसेंबरला अचानक रद्द झाल्याने १२२ प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. यानंतर स्पाईस जेटचे १७ डिसेंबरलाही विमान रद्द झाल्याने ११० प्रवाशांना धावाधाव करण्याची वेळ आली. मंगळवारचे विमान रद्द झाल्यानंतर बुधवारचे विमान जाणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. अशा स्थितीतही तिकिटाची बुकिंग झाली. यानंतर पुन्हा बुधवारी विमान रद्द झाले. यामुळे किमान गुरुवारी जाणार का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. याविषयी काहीही सांगता येणार नसल्याचे स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच विमानतळावरील स्पाईस जेटच्या कक्षाशी संपर्क साधून पुढील उड्डाण रद्द आहे का, अशी शंकाही अनेक प्रवाशांकडून विचारली जात होती. त्यामुळे औरंगाबादहून पुढील उड्डाणे होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Web Title: Aishwarya ... The plane jumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.