एअर इंडियाच्या मोठ्या विमानाचे पुन्हा उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:23 IST2019-04-10T00:22:29+5:302019-04-10T00:23:18+5:30
मुंबई आणि दिल्लीसाठी मंगळवारी पुन्हा एकदा नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. बुधवारीदेखील मोठे विमान उड्डाण करणार आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एअर इंडियाच्या मोठ्या विमानाचे पुन्हा उड्डाण
औरंगाबाद : मुंबई आणि दिल्लीसाठी मंगळवारी पुन्हा एकदा नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. बुधवारीदेखील मोठे विमान उड्डाण करणार आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एअर इंडियाचे १२२ प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई-औरंगाबाद-दिल्ली, दिल्ली-औरंगाबाद-मुंबई मार्गावर आहे. जेट एअरवेजची विमानसेवा सध्या बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मागणी वाढत असल्याने ४ एप्रिल रोजी एअर इंडियाकडून १२२ ऐवजी १६२ आसनक्षमता असलेले विमान देण्यात आले. या विमानातून १५० प्रवाशांनी मुंबईचा प्रवास केला. त्यानंतर पुन्हा एकदा मंगळवारी १६२ आसनी विमानाने उड्डाण केले, अशी माहिती एअर इंडियाचे अजय भोळे यांनी दिली.