शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

ऐन परीक्षेच्या तोंडावर ऐकू येणे बंद; रिक्षाचालकाच्या मुलाला हवा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:50 IST

जागतिक श्रवण दिन : ‘काॅक्लियर इम्प्लांट’ मशिनसाठी तब्बल ३.६५ लाख रुपये लागणार; अमितचे रिक्षाचालक वडील आणि आईकडून मदतीचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : अमित पद्माकर रिठे हा १५ वर्षांचा मुलगा. सगळे काही सुरळीत सुरू होते, परंतु १५ दिवसांपूर्वी त्याला ऐकू येणेच बंद झाले. कारण, त्याच्या कानाचे ‘काॅक्लियर इम्प्लांट’चे मशिन बंद पडले. ऐन परीक्षेच्या तोंडावर मशिन बंद पडल्याने शाळेत शिक्षक काय शिकवितात, हे त्याला समजेना झाले. या मशिनसाठी तब्बल ३.६५ लाख रुपये लागणार असल्याने अमितचे रिक्षाचालक वडील आणि आईने मदतीचे आवाहन केले आहे.

दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक श्रवण दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश श्रवण समस्या, कर्णबधिरता आणि त्याच्या प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करणे आहे. आजच्या ध्वनी प्रदूषित वातावरणात कानांचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जन्मत:च ऐकू न येणाऱ्या बालकांवर ‘काॅक्लियर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया केली जाते. या महागड्या शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून मदत होते. मात्र, शस्त्रक्रियेच्या पाच ते सहा वर्षांनंतर मशिन बंद पडते, तेव्हा शासनाकडून मदत मिळत नसल्याने अनेक बालकांचे भवितव्य पुन्हा अंधकारमय होते. अशीच काहीशी वेळ चिकलठाणा परिसरातील रहिवासी अमित रिठे या मुलावर आली आहे.

कुणाचाही आधार मिळेनासहा वर्षांचा असताना, अमितची ‘काॅक्लियर इम्प्लांट’ची शस्त्रक्रिया झाली होती. आता मशिन अचानक बंद पडली. कोणत्याही योजनेचा आधार मिळत नाही. अमितचे वडील रिक्षा चालवितात. मी घरकाम करते. मशिनसाठी ३.६५ लाख रुपये जमा करू शकत नाही.- नंदा पद्माकर रिठे, आई

...अशी वाढली मशिनची किंमत- सप्टेंबर २०२२ : २.५७ लाख रु.- जुलै २०२३ : ३.१९ लाख रु.- मार्च २०२४ : ३.३३ लाख रु.- जुलै २०२४ : ३.४५ लाख रु.- फेब्रुवारी २०२५ : ३.६५ लाख रु.

यापूर्वी ‘लोकमत’ने दिली तिघांना श्रवणशक्तीयापूर्वी ‘लोकमत’, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि अनेक दानशूर व्यक्ती, संस्थांनी मशिनसाठी केलेल्या मदतीमुळे प्रकाशनगरातील सोहम पाटील, वाळूज येथील कार्तिक जाधव आणि फुलेनगर येथील आदर्श निकाळजे या तीन मुलांना पुन्हा ऐकू येऊ लागले.

दानशूर व्यक्ती, औद्योगिक कंपन्यांनी पुढाकार घ्यावाअमितला ‘काॅक्लियर इम्प्लांट’ची मशिन मिळण्यासाठी दानशूर व्यक्ती, तसेच औद्योगिक कंपन्यांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsocial workerसमाजसेवक