शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरात वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: May 13, 2014 01:08 IST

अहमदपूर : अहमदपूर शहरातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूने शिवाजी चौक, सावरकर चौक, आंबेडकर चौक, बसवेश्वर चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले

 अहमदपूर : अहमदपूर शहरातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूने शिवाजी चौक, सावरकर चौक, आंबेडकर चौक, बसवेश्वर चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असल्याने शहरात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. साधारणपणे एक वर्षापूर्वी नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आले होते. त्यानंतर तेथे काही दिवस अतिक्रमण करु दिले गेले नाही. मात्र मागच्या काही महिन्यापासून अतिक्रमणधारकांनी पुन्हा आपल्या पूर्वीच्याच जागी हळूहळू अतिक्रमण करणे सुरू केल्याने आजघडीला शहरात प्रचंड अतिक्रमण वाढले आहे. बसस्थानकासमोरील लातूर-नांदेड रोड, अंबाजोगाई रोड, थोडगा रोड तसेच शहरातील काही इतर रस्त्यांच्या दोन्ही बाजूने अनेकाने पत्र्याचे, लाकडाचे शेड मारुन अतिक्रमण केले आहे. तर अनेकांनी या रस्त्याच्या बाजूला चहा, पानसुपारीच्या टपर्‍या उभ्या केल्या आहेत. अनेकांनी या ठिकाणी छोटे-मोठे विविध व्यवसाय सुरू करून अतिक्रमण केले आहे. शिवाजी चौक, सावरकर चौक, आझाद चौक हे चौक तर हातगाडेवाल्यांनी भरून गेले आहेत. या चौकात भाजीपाला, विविध प्रकारचे फळे असलेले हातगाडे मोठ्या प्रमाणात उभे केले जातात. त्यामुळे पादचार्‍यांना व वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. लातूर-नांदेड रोड तर अतिक्रमणानी फुलून गेला असल्याने या रोडवर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. बसवेश्वर चौक ते सावरकर चौक दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊन वाहनाच्या रांगाच्या रांगा नेहमीच दिसून येतात, असे असतानाही नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. सा.बां. विभाग व न.पा. प्रशासन यांनी आपापल्या जागेतील अतिक्रमण काढले तर वाहतुकीची होणारी कोंडी कमी होऊ शकते. वाहतुकीची कोंडी दूर करू शहरात सध्या नांदेड-लातूर मार्गावर दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम सुरू आहे. त्याचे साहित्य रस्त्यावर पडल्याने भाजीपाला विक्रेते रस्त्यावर आले आहेत. परिणामी खरेदीसाठी आलेल्या मोटारसायकल धारकांनाही वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतुकीच्या कोंडीबाबत सा.बां. विभागाला पत्र दिले आहे, त्यामुळे सदरील नालीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर थांबणार्‍या वाहनधारकांवर कारवाई करून वाहतुकीची कोंडी दूर करू, अशी प्रतिक्रिया अहमदपूरचे पोलीस निरीक्षक सोपान मोरे यांंनी लोकमतशी बोलताना दिली. (वार्ताहर)