शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश

By बापू सोळुंके | Updated: August 25, 2023 19:00 IST

मराठवाड्यातील जालना, परभणी, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली वगळता अन्य सहा जिल्ह्यात अत्यल्प आणि केवळ रिमझिम पाऊस झालेला आहे. मुसळधार  पाऊस न पडल्यामुळे मराठवाड्यातील मोठ्या आणि मध्यम आणि लघू पाटबंधारे तलावात अत्यल्प जलसाठा उरला आहे. आगामी काळात पाऊस पडेल अथवा नाही, याविषयी शाश्वती नसल्याने मराठवाड्यातील सर्वच धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी आढावा बैठकीनंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, मराठवाड्यातील जालना, परभणी, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला आहे. परिणामी या जिल्ह्यातील लहान,मोठ्या धरणांत अत्यल्प जलसाठा आहे. मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू तलावात खूप कमी जलसाठा आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई तसेच पशुधनांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची परिस्थिती  आज दिसत आहे. ही बाब विचारात घेऊन मराठवाड्यातील सर्वच धरणांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे कृषीमंत्री मुंंडे यांनी सांगितले.

मराठवाड्यातील धरणांची संख्या आणि आजचा जलसाठामोठी प्रकल्प- ११----------- ४२ टक्केमध्यम प्रकल्प--७५----------२२टक्केलघू पाटबंधारे प्रकल्प-----७४९------२१टक्केगोदावरी नदीवरील बंधारे----१५-------------३६ टक्केतेरणा, मांजरा आणि रेणा नदीवरील बंधारे---२७-----३३टक्के

 

टॅग्स :RainपाऊसDhananjay Mundeधनंजय मुंडेWaterपाणीFarmerशेतकरी