स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढणार

By Admin | Updated: December 18, 2015 00:20 IST2015-12-18T00:11:30+5:302015-12-18T00:20:42+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्याबाबत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,

Age limit for competitive examinations will be increased | स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढणार

स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढणार

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्याबाबत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी विधिमंडळात जाहीर केल्याने वयोमर्यादा वाढविण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मागील काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी होत आहे.
बुधवारी आ. सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत यासंबंधीची सूचना मांडली होती. त्यावर शिंदे यांनी वयोमर्यादा वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करील, असे स्पष्ट केले. इतर राज्यांत स्पर्धा परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट ४० वर्षे, तर मागासवर्गीयांसाठी ४२ वर्षे आहे.
सध्या राज्यात स्पर्धा परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३३ वर्षे आहे, तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी २८ वर्षे आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३३ वरून ४० आणि पोलीस उपनिरीक्षक पदासाठी २८ वरून ३३ करण्यात यावी, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली.
सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे मोठ्या प्रमाणावर वळत असून, त्यांना परीक्षेच्या तंत्राची ओळख होण्यास उशीर लागतो. यामुळे वयोमर्यादा वाढविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास त्याचा युवकांना फायदा होणार आहे.

Web Title: Age limit for competitive examinations will be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.