शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अतिक्रमण

By admin | Updated: February 20, 2015 00:09 IST

बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. काही महिन्यापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते

बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. काही महिन्यापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते मात्र आता जैसे थे स्थिती झाली असून वाहतूक कोंडी व अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे अतिक्रमण हटाव पथकाचे दुर्लक्ष होत आहे.काही महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांमुळे महामार्ग अरूंद झाला आहे. तसेच यामुळे अपघातासही निमंत्रण मिळत होते. असे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पालिकेने महामार्गांवरील अतिक्रमणावर हातोडा फिरविला होता. त्यानंतर काही दिवस महामार्गाने मोकळा श्वास घेतला. वाहतूक कोंडीही झाली नाही. अपघातालाही आळा बसला होता. मात्र आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. यापूर्वी या अतिक्रमणामुळेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहराला बायपास व उड्डाणपूल नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. त्यातच अतिक्रमणाने यामध्ये भर टाकली आहे. ही अतिक्रमणे हटवावीत यासाठी अनेक वेळा सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने केली, मोर्चे काढले. तात्पुरती अतिक्रमणेही हटविण्यात आली. मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याने पालिका, सा.बां. विभाग व पोलीस प्रशासनाचा या अतिक्रमणधारकांवर किती वचक आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. छोटे- मोठे हातगाडेवाल्यांसह दुकानदारांनी अतिक्रमणे केली आहेत.या अतिक्रमणांमुळे साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जालनारोड, नगररोड, नगरनाका, बार्शीनाका, बार्शीरोड आदी मुख्य ठिकाणी सर्रास वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनाही कोंडी सोडविताना नाकीनऊ येतात. यातच अपघातही घडत आहेत. यासाठी ही अतिक्रमणे हटवून महामार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी शहरवासीयांमधून व वाहनधारकांमधून केली जात आहे. (प्रतिनिधी)