शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस शोध घेतल्यानंतर राजेंद्र जैन लागला पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 13:45 IST

विश्वनाथ पेठे यांनी पोलिसांत तक्रार केल्याची माहिती राजेंद्र जैन याला मिळाली होती.

ठळक मुद्देएका नवीन अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये तो सापडला.पोलिसांनी रात्री त्याच्या फ्लॅटबाहेर साध्या वेशात पहारा दिला.

औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ५८ किलो सोने चोरीतील प्रमुख आरोपी राजेंद्र जैन याला पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तब्बल तीन दिवस निराला बाजारातील त्याच्या घरासह परिसरातील सर्व हॉटेल्स, लॉज आणि रुग्णालयांची तपासणी करावी लागली. शेवटी एका नवीन अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये तो सापडला.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या मालकाचा विश्वासघात करून व्यवस्थापक राणे याने ५८ किलो सोने चोरून जैन कुटुंबाला दिले. आरोपी अंकुर राणे हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मूळ रहिवासी आहे. तो कृषी पदवीधर असून, मागील पंधरा वर्षांपासून वामन हरी पेठे ज्वेलर्सकडे नोकरीला आहे. तो औरंगाबादच्या शाखेत नऊ वर्षांपासून कार्यरत असून, सन्मित्र कॉलनीत भाड्याने राहतो. आरोपी राजेंद्र जैन हा निराला बाजारातील बालाजी अपार्टमेंटमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह भाड्याने राहतो. तेथेच तो साडी विक्रीचा व्यवसाय करतो, असे दाखवितो. आरोपी लोकेश हा बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.

अशी केली दोन वर्षांत ५८ किलो सोन्याची हेराफेरी

या प्रकरणात विश्वनाथ पेठे यांनी पोलिसांत तक्रार केल्याची माहिती राजेंद्र जैन याला मिळाली होती. यामुळे अटक टाळण्यासाठी राजेंद्र हा घरी राहतच नव्हता. मात्र त्याच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन निराला बाजार येत होते. यामुळे पोलीस त्याचा शोध निराला बाजार परिसरातच घेत होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी निराला बाजार येथील सर्व हॉटेल, लॉज आणि रुग्णालयातही शोध घेतला; परंतु तेथे राजेंद्र सापडला नाही. राजेंद्रने निराला बाजारातच फ्लॅट खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी रात्री त्याच्या फ्लॅटबाहेर साध्या वेशात पहारा दिला. तो बाहेर येताच त्याला पकडले. तर आरोपी अंकुर आणि लोकेशला तत्पूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

फ्लॅटमधून बाहेर पडताना घ्यायचा काळजीआरोपी राजेंद्र हा फ्लॅटमधून बाहेर पडताना पोलीस नसल्याची खात्री करीत होता. तो  त्याची पत्नी आणि नातेवाईकांना त्याच्या घराच्या परिसरात बाहेर पोलीस दिसतात का, हे पाहण्यास पाठवीत असे. पोलीस नसल्याची खात्री झाल्यानंतरच तो फ्लॅटमधून बाहेर येई.

टॅग्स :theftचोरीGoldसोनंAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसArrestअटक