शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

विद्युत बिघाडानंतर आता पाईपलाईन फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:37 IST

सलग दोन दिवसांतील या घटनांमुळे शहरवासीयांना पुढील काही दिवस पाणीपुरवठ्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

छत्रपती संभाजीनगर: चितेगाव परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना बुधवारी सकाळी ९.४५ वाजता व्हिडिओकॉन कंपनीसमोर जमिनीखालील मुख्य जलवाहिनी पोकलेन मशीनमुळे फुटली. १२०० मिमी व्यासाची ही पाईपलाईन छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख लाईनपैकी एक असून, फुटीमुळे जवळपास ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले. यामुळे त्या परिसरात गोंधळ उडाला असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली.

या अपघातामुळे शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच सोमवारी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात दुपारी ३:३० वाजता महावितरणच्या ३३ केव्ही लाईनवरील दोन कंडक्टर आणि पिन इन्सुलेटर तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी, जायकवाडी येथील पंप बंद पडले आणि संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुमारे सहा तास ठप्प झाला. रात्री ८ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. मात्र पंपिंग पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ लागल्याने पाणी शहरात रात्री १० वाजता पोहोचले. परिणामी, अनेक वसाहतींना नियोजित वेळेपेक्षा उशिराने किंवा दुसऱ्या दिवशी पाणी मिळाले.

दरम्यान, दोन ते तीन आठवडे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. मात्र, सलग दोन दिवसांतील या घटनांमुळे शहरवासीयांना पुढील काही दिवस पाणीपुरवठ्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका