शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
2
मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!
3
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
4
'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक
5
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
6
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
7
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
8
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
9
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
10
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
11
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
12
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
13
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
14
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
15
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
16
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
17
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
18
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
19
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
20
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या आश्वासनानंतर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन मागे

By बापू सोळुंके | Published: May 05, 2023 4:01 PM

मराठवाडा आणि राज्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील सर्व मराठा समाजाचा मराठा कुणबी या प्रवर्गातून ओबीसी आरक्षण लागू आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने १ मे पासून क्रांतीचौकात सुरू असलेले ठिय्या आंदोलन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या आश्वासनानंतस मागे घेण्यात आले. आंदोलकांच्या मागणीनुसार मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक लावली जाईल, असे आश्वासन यावेळी भुमरे यांनी दिल्याने आंदोलन मागे घेतल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

मराठवाडा आणि राज्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील सर्व मराठा समाजाचा मराठा कुणबी या प्रवर्गातून ओबीसी आरक्षण लागू आहे. मराठा आणि कुणबी मराठा एकच असल्याने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून प्रमाणपत्र देण्यात यावे, यामागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतीचौकात १ मे पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उन, पावसात सुरू असलेल्या या आंदोलना विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सचीन आहिर यांनी भेटी दिल्या होत्या. ही बाब समजल्यानंतर शुक्रवारी दुपारी पालकमंत्री संदीपान भुमरे , शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह क्रांतीचौकात जाऊन आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. 

यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री बैठकीत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यावेळी आंदोलकांच्या मागणीनुसार भुमरे यांनी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षण विषयावर तातडीने बैठक लावण्याची मागणी करणारे पत्र पाठवले. या पत्राची एक प्रत आंदोलकांना दिले. पालकमंत्र्यांनी प्रमाणिक प्रयत्न केल्याने हे आंदोलन मागे घेण्याचा आणि सायंकाळी आत्मदहन करण्याचा दिलेला इशाराही मागे घेतल्याचे यावेळी जाहिर केले. या आंदोलनात प्रा.चंद्रकात भराट, सुरेश वाकडे,  सतीश वेताळ,  दिव्या पाटील, रेखा वाहटुळे, ॲड. सुवर्णा मोहिते, सुकन्या भोसले,डॉ. शिवानंद भानुसे, प्रा.भाऊसाहेब शिंदे, शिवाजी भिंगारे, रविंद्र वाहटुळे,  पंढरीनाथ काकडे, राम लघाने, साईनाथ कोसोळे, आशिष औताडे, सुनील औताडे, बी.एस.खोसे, कैलास गोर, अशोक मोरे, रमेश गायकवाड, शिवम भराट, कृष्णा भराट,प्रसाद भागिले आदींची सहभाग होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादSandipan Bhumreसंदीपान भुमरे