सात दिवसानंतरही निर्जळी
By Admin | Updated: June 16, 2017 23:23 IST2017-06-16T23:17:43+5:302017-06-16T23:23:02+5:30
हिंगोली : सिद्धेश्वर धरणावरून पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाला बिघाडामुळे मागील सहा-सात दिवसांपासून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा झाला नाही

सात दिवसानंतरही निर्जळी
हिंगोली : सिद्धेश्वर धरणावरून पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाला होणारा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला असल्याने मागील सहा-सात दिवसांपासून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा झाला नाही.
नगरपालिकेने शहरातील विविध भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे. मात्र मागील तीन दिवसांपासून वीजच नसल्याने पालिकेच्या जलकुंभांमध्ये पाण्याचा थेंबही येत नाही. त्यामुळे पालिकेचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहरात जवळपास तेरा जलकुंभ आहेत. आता काही भागात सात दिवसांनंतरही पाणी न आल्याने नागरिकांतून ओरड होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. आता उन्हाळा नसतानाही टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. निव्वळ नळाच्याच पाण्यावर अवलंबून असलेल्यांना तर विकतचे पाणी नेण्याची वेळ येत आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला तरच शनिवारी पाणीपुरवठा होईल अन्यथा रविवारीच शहरात काही भागाला पाणी मिळेल.