एक दिवसाच्या बंदनंतर रिक्षा वाहतूक पूर्ववत
By Admin | Updated: June 27, 2014 01:02 IST2014-06-27T00:59:04+5:302014-06-27T01:02:30+5:30
औरंगाबाद : प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या एक दिवसाच्या बंदनंतर गुरुवारी जालना रोडसह विविध मार्गांवर रिक्षा, अॅपेरिक्षांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू झाली.

एक दिवसाच्या बंदनंतर रिक्षा वाहतूक पूर्ववत
औरंगाबाद : प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या एक दिवसाच्या बंदनंतर गुरुवारी जालना रोडसह विविध मार्गांवर रिक्षा, अॅपेरिक्षांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू झाली.
एस. टी. महामंडळाने त्या एका दिवसासाठीच जादा शहर बसेसचे नियोजन केले होते. त्यामुळे गुरुवारी शहर बसेसची संख्या ३२ झाली. पर्यायाने शहर बसची वाट बघण्यापेक्षा १० ते १५ रुपयांत सीटर रिक्षा, अॅपेरिक्षांना प्रवाशांनी पसंती दिली.
परिवहन आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ २५ जून रोजी काही रिक्षा व अॅपेरिक्षा संघटनांनी बंद पाळला. त्यामुळे जालना रोड, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानकांसह अन्य मार्गांवर १० ते १५ रुपयांत टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, अॅपेरिक्षा बंद होत्या. परिणामी प्रवाशांना जास्त पैसे मोजून प्रवास करावा लागला. मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची धावपळ झाली. एस. टी. महामंडळाकडून बंदच्या पार्श्वभूमीवर जादा शहर बसेस सोडण्यात आल्या होत्या. रस्त्यावर रिक्षा नसल्यामुळे शहर
बसला नेहमीपेक्षा जास्त गर्दी
होती.
सेव्हन हिल उड्डाणपुलाखालून जाऊ देण्याची मागणी क रीत काही अॅपेरिक्षाचालकांनी आपली वाहने रस्त्यावर उभी केल्याचे दिसले.