शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

पाणंदमुक्तीपाठोपाठ लोळदगावची वाटचाल आता दुष्काळमुक्तीकडे !

By admin | Updated: December 28, 2015 00:22 IST

बीड : तीन महिन्यात शंभर टक्के पाणंदमुक्त झालेल्या लोळदगावने आता जलसंधारणासाठी ‘नाम’ फाऊंडेशनच्या मदतीने पाऊल उचलले आहे.

बीड : तीन महिन्यात शंभर टक्के पाणंदमुक्त झालेल्या लोळदगावने आता जलसंधारणासाठी ‘नाम’ फाऊंडेशनच्या मदतीने पाऊल उचलले आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसह गावाजवळून जाणाऱ्या नदीपात्राचे खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपूरे या जोडगोळीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सर्वात आधी रोख आर्थिक मदत करुन मनाची श्रीमंती दाखविली होती. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी त्यांनी ‘नाम’ फाऊंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. ‘नाम’च्या जलसंधारण कामाचा नारळ लोळदगाव येथे नुकताच फुटला होता. लोळदगाव येथील जमीन काळीभोर व सुपीक;परंतु सततच्या दुष्काळी स्थितीने लागवड खर्चही पदरात पडणे मुश्किल बनलेले. बिंदूसरा नदीतील पाणी आले तसे वाहून जात होते. या पार्श्वभूमीवर ‘नाम’ ने येथे सुरु केलेली जलसंधारणाच्या कामांना महत्त्व प्राप्त झाले आहे. तीन कि़ मी. अंतरापर्यंत नदीचे सरळीकरण होत असून खोलीकरण व रुंदीकरणाचे कामही प्रगतीपथावर आहे. बंधाऱ्याची डागडुजीबिंदूसरा नदीवर १९९६ मध्ये कोल्हापुरी बंधारा बांधलेला होता;परंतु गेल्या काही वर्षांपासून बंधाऱ्याची पुरती दुरवस्था झाली होती. भगदाड पडल्याने पाणी टिकत नव्हते. या बंधाऱ्याची दुरू स्ती केली जात असून त्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे.१०० किमीपर्यंतची कामे करणार‘नाम’ फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील १०० किमी अंतरापर्यंत नदीपात्रांचे रुंदीकरण, सरळीकरण व खोलीकरणाची कामे जूनपूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. राज्य समन्वयक शेषेराव आघाव यांनी जिल्ह्याला २० पोकलेन यंत्र व इतर सामुग्री देण्याचे जाहीर केले आहे. मराठवाडा समन्वयय राजाभाऊ शेळके हे या कामांवर नियंत्रण ठेवून आहेत. लोळदगाव सोबतच पिंपळनेर, तरडगव्हाण आदी गावांतही कामे वेगाने सुरु आहेत. गावकरीही सरसावले‘नाम’ने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या जलसंधारण कामाला लोळदगाव ग्रामस्थांनीही बळ दिले आहे. चार लाखांपेक्षा अधिक रक्कम लोकसहभागातून उभी केली आहे. शिवाय श्रमदानही होतेय. (प्रतिनिधी)