चाकू लागून मृत्यू प्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 8, 2015 00:25 IST2015-05-08T00:12:58+5:302015-05-08T00:25:35+5:30
परतूर: पैशाच्या देवाण-घेवाणीवरून अठरा वर्षीय युवकाच्या मांडीवर चाकूने वार करून त्यास जिवे मारल्याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुरूवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

चाकू लागून मृत्यू प्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल
परतूर: पैशाच्या देवाण-घेवाणीवरून अठरा वर्षीय युवकाच्या मांडीवर चाकूने वार करून त्यास जिवे मारल्याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुरूवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालक्यातील चिंचोली येथे घडली.
चिंचोली येथे दि. ६ मे रोजी मयत विकास मदन चव्हाण (रा. चिंचोली) याचा व आरोपी पृथ्वीराज उर्फ ऋषिकेश प्रदिप चव्हाण (रा. बालाजी नगर, परतूर) यांच्यात पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात आरोपीने मयत विकास चव्हाण याच्या डाव्या पायाच्या मांडीला शिरेवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
यामध्ये विकास चव्हाण यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणताना ६ मे रोजी मृत्यू झाला. प्रेताचे शवविच्छेदन वेद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर. नवल योनी केले होते.
७ मे रोजी दुपारी मयताचे वडील मदन उत्तमराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून, तपास पोलिस उपनिरीक्षक पि. एस. बोलकर व पो. कॉ. शामराव गायके हे करीत आहेत. (वार्ताहर)