पावसाअभावी खरीप पिके गेली करपून

By Admin | Updated: October 27, 2014 00:12 IST2014-10-26T23:51:12+5:302014-10-27T00:12:56+5:30

सिल्लोड : यावर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने ऐनवेळी हिरावून घेतला.

After kharif crops have been lost due to lack of rain | पावसाअभावी खरीप पिके गेली करपून

पावसाअभावी खरीप पिके गेली करपून

सिल्लोड : यावर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने ऐनवेळी हिरावून घेतला. एका पाण्यामुळे मका पीक उद्ध्वस्त झाले. कपाशीच्या सर्व फुले, पात्या गळाल्या. चवळी, उडीद, मूग यावर्षी झाले नाही. आवक नसल्याने शेतकऱ्यांनी साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
सिल्लोड शहरात सर्व दुकानांवर शुकशुकाट दिसून आला. नोकरवर्ग, व्यापारी, मध्यमवर्गीय थोड्याफार प्रमाणात खरेदी करताना दिसत होते, तर शेतकऱ्यांमध्ये म्हणावा तसा उत्साह दिसून आला नाही. गेल्या महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीचा प्रचार व राजकीय धुळवड बघायला मिळाली. या धुळवडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणी लक्ष दिले नाही. त्यामुळे या दुष्काळाचे चटके केवळ अन् केवळ शेतकऱ्यांना खावे लागले. विजेचा प्रश्न पाण्याची चिंता यापेक्षा निवडणूक महत्त्वाची असल्याने सर्वजण प्रचारात मग्न दिसले. याचा परिणाम बाजारपेठेवर दिसत आहे. साध्या पद्धतीने शेतकऱ्यांनी दिवाळी शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट साजरी केली. आता डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. मागील वर्षी गारपिटीमुळे शेतकरी त्रस्त होते तर यावर्षी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी वैतागले आहेत. उशिरा पेरणी झाल्याने म्हणावी तशी कोरडवाहू कपाशी उगवली नाही, विजेच्या लपंडावामुळे विहिरीतील पाणी देण्याचे नियोजन शेतकऱ्यांना करता आले नाही. परिणामी उत्पादन घटणार हे निश्चित. यामुळे केलेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात काही मोजक्या भागात विहिरींना पाणी आहे, तर अनेक विहिरी आटल्या आहे, यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी तथातथाच दिसत आहे.
पिके कोमात आणेवारी जोमात
बाजारसावंगी- एकीकडे पावसाअभावी खरीप पिके कोमात असून नाले, तलाव, विहिरी कोरड्याठाक असताना रबी पेरणीस शेतकरी धजावत नसताना महसूल खात्याची आणेवारी मात्र जोमात दिसून येत आहे. महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिके कोमात असतानाही चालू वर्षीची बाजारसावंगी परिसराची आणेवारी ५८ टक्क्यांच्या वर असल्याची नोंद केली आहे. महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आणेवारी ठरवण्याऐवजी कार्यालयात बसून आणेवारी ठरवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात बाजारसावंगीपरिसरातील शेतकऱ्यांची सरपंच भीमराव नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन निषेध करण्यात आला.
उपसरपंच भाऊराव काटकर, बाळकृष्ण लोंढे, पुंजाजी नलावडे, अप्पासाहेब जाधव, गुलाबराव लोंढे, विष्णू नलावडे, चाँद पठाण, सुभाष धनेधर, गणेश नलावडे व इतरांनी कार्यालयात बसून ठरविण्यात आलेली आणेवारी रद्द करून प्रत्यक्ष पाहणी करून कमीची आणेवारी दाखवावी, नसता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Web Title: After kharif crops have been lost due to lack of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.