शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दागिने विकल्यानंतर सोनारानेच सोनाराला लुटले; तिघे अटकेत, ९ किलो चांदी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 12:53 IST

गुन्हे शाखेकडून गुन्हा उघड: पाच जणांचे कृत्य, तीन जणांना बेड्या आणि ९ किलो चांदी जप्त

औरंगाबाद : आसेगावहून माळीवाड्याकडे येत असलेल्या फुलंब्रीच्या सोनाराला दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी बंदुकीचा धाक दाखवून साडेचार किलो चांदीचे दागिने लुटल्याची घटना रविवारी घडली होती. यात ज्या सोनाराला चांदीचे दागिने दिले, त्याने मित्रांच्या सहाय्याने सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटल्याचे उघडकीस आले. पाचपैकी तीन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. या दरोडेखोरांकडून ८ किलो ८८१ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले.

सोन्याचे व्यापारी नितीन साहेबराव घाडगे (रा.फुलंब्री) हे आसेगाव येथे दागिने देऊन माळीवाड्याकडे येत होते. तेव्हा त्यांना लुटण्यात आले. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने गुन्ह्यांचा समांतर तपास करताना दागिने दिलेल्या आसेगाव येथील जय मातादी ज्वेलर्सच्या मालकावर बारकाईने लक्ष ठेवले. तसेच हॉटेल रायगडमधील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यानंतर ‘जय मातादी’चा मालक शरद नानासाहेब पवार (रा. गंधेश्वर, ता. कन्नड, ह.मु. माळीवाडा) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

सोनाराला लुटण्याचा प्लॅन पवार याने मित्र नंदकुमार हरिचंद्र निळे (रा. शरणापूर) याच्यासोबत बनवला होता. रविवारी घाडगे हे पवारच्या दुकानात दागिने देऊन निघाल्यानंतर निळेच्या दुचाकीवरून प्रवीण फकीरचंद पवार (रा. शरणापूर), आनंद राजपूत ऊर्फ लकवाल (ह.मु. बिडकीन, रा. जांभळीवाडी, ता. पैठण) आणि गुड्डु आरण (रा. घोडेगाव, ता.नगर) या तिघांनी रायगड हॉटेलजवळ आल्यानंतर घाडगे यांची दुचाकी अडवून त्यांना मारहाण करीत डोक्याला बंदूक लावली. तसेच जवळील दागिन्यांची बॅग हिसकावून घेत दुचाकीवर पोबारा केला होता. शरद पवार, नंदकुमार निळे आणि प्रवीण पवार यांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

ही कामगिरी पो.नि. आघाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि. मनोज शिंदे, हवालदार संतोष साेनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विशाल पाटील, रवींद्र खरात, विलास मुठे, नितीन देशमुख, दत्तात्रय गढेकर, संजयसिंग राजपूत, विठ्ठल सुरे, विजय भानुसे, संदीप बीडकर, अजहर कुरेशी, ज्ञानेश्वर पवार आणि अजय चौधरी यांच्या पथकाने केली.

लोकेशन अन् चारचाकीमुळे जाळ्यातपवार याने व्यापारी घाडगे यांना लुटण्याचा प्लॅन बनवला होता. घाडगे यांनी त्याच्या दुकानात चांदीचे दागिने दिले. त्या दागिन्यांचे पैसेही त्याने दिले. त्याच वेळी तत्काळ जायचे असल्याचे सांगून तो दुकानातून बाहेर पडला. ठरल्यानुसार पवार याने स्वत:ची चारचाकी गाडी काढली. पोलिसांना ओळखू येऊ नये म्हणून संबंधितांना व्हाॅट्सॲप कॉल केले. घटनेनंतर पोलिसांनी चौकशीसाठी पवारला बोलावले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. गुन्हे शाखेचे सपोनि. शिंदे यांनी हॉटेलवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये लुटणाऱ्या दुचाकीवरील तिघांचा व्यापारी घाडगे पाठलाग करीत होते. त्याच वेळी एक चारचाकी कमीजास्त वेगात पाठीमागून येत होती. चारचाकी गाडीविषयी माहिती काढल्यानंतर ती पवारचीच निघाली. तसेच त्याच्याकडे बंदूक असल्याची गुप्त माहिती मिळाली. घटनेच्या वेळी पवारचे लोकेशन तपासल्यानंतर ते घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर निघाले. त्यामुळे संशय बळावला आणि ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.

हा मुद्देमाल जप्तगुन्हे शाखेने आरोपी निळे याच्या घरातून चांदीचे १३ कडे, जोडव्याचे १२० जोड, गळ्यातील ५४ चेन, ७३ ब्रासलेट, १ हजार ३७५ अंगठ्या असा एकूण ८ किलो ८८१ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. त्याची किंमत ५ लाख ३२ हजार ८६० रुपये होती. त्याशिवाय इतरही मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्ह्यात दरोड्याचे कलम वाढविले आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी