शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पंचनामे होऊन चार महिने झाले तरी दुष्काळग्रस्तांना कसलीही मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:27 IST

काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख आमदार बसवराज पाटील यांनी  सांगितले. 

ठळक मुद्देदुष्काळाकडे सरकारचे संपूर्ण दुर्लक्षफळबागांची नुकसानभरपाई तातडीने द्यावी काँग्रेसकडून शेतकऱ्यांना मदत 

औरंगाबाद : दुष्काळाकडे शासनाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असून, शासनाची कसलीही मदत दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचलेली नाही. कामे नाहीत म्हणून लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. वाळलेल्या फळबागांचे पंचनामे होऊन चार-चार महिने झाले तरी शासनातर्फे कसलीही मदत दिली गेली नाही, असे काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख आमदार बसवराज पाटील यांनी  सांगितले. 

औरंगाबाद व जालना जिल्ह्यांचा दुष्काळी पाहणी दौरा करून आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते. फळबागांच्या नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी, मागेल तेथे चारा छावणीला त्वरित परवानगी देण्यात यावी व प्रतिजनावरांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी, चारा छावणीसाठी डिपॉझिटची अट रद्द करण्यात यावी व छावणीवर ४ टक्के जीएसटी कर व २ टक्के टीडीएस व टॅगिंगची अट, आॅनलाईन प्रक्रियेची अट रद्द करण्यात यावी, ड्रीप व ठिबकचे प्रलंबित अनुदान त्वरित देण्यात यावे, जायकवाडीचे पाणी हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यांमध्ये त्वरित सोडण्यात यावे, ब्रम्हगाव लिफ्ट टप्पा नं. २ द्वारे खेर्डा प्रकल्पात पाणी देण्याची योजना त्वरित पूर्ण करण्यात यावी, मागणी केलेल्या गावात पाण्याचे टँकर त्वरित सुरू करण्यास मंजुरी देण्यात यावी, दुष्काळी भागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींना सतर्क राहण्यास सांगावे, खरीप पिकांसाठी बी-बियाणे, खते मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत, रोहयोची कामे त्वरित चालू करण्यात यावीत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज विनाअट त्वरित माफ करण्यात यावे, खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना विनाअट तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. 

प्रदेश काँग्रेसने आ.बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही विभागीय समिती स्थापन केली आहे. पत्रपरिषदेनंतर ही समिती बीड जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणीसाठी रवाना झाली. पत्रपरिषदेस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, माजी आमदार सुरेश जेथलिया, समन्वयक भीमराव डोंगरे, विलासराव औताडे, डॉ. कल्याण काळे, शहर कार्याध्यक्ष मीर हिदायत अली, संतोष भिंगारे, डॉ. पवन डोंगरे, किसान काँग्रेसचे हिशाम उस्मानी, तकी हसन, वसंतराज वक्ते आदींची उपस्थिती होती.

मदतीचा हात...कन्नड तालुक्यातील गारडा गावात काही दिवसांपूर्वी आग लागल्याने चार घरे जळाली होती. ती शेतकऱ्यांची होती. किसान काँग्रेसचे राष्ट्रीय सहसमन्वयक मो. हिशाम उसनी यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. आज या शेतकऱ्यांना बसवराज पाटील यांच्या हस्ते एकूण ३२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. या शेतकऱ्यांना घरकुल योजनेत घरे देण्यात यावीत, शेतीची अवजारे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाcongressकाँग्रेसfundsनिधी