अखेर ‘त्या’ पाट्या काढणार
By Admin | Updated: July 1, 2014 01:06 IST2014-07-01T00:47:10+5:302014-07-01T01:06:18+5:30
वरूड बु. : जाफराबाद तालुक्यातील वरूड बु. येथे मागील दोन महिन्यांपासून गावात ग्रामपंचायतच्या हद्दीत पाट्या लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता.

अखेर ‘त्या’ पाट्या काढणार
वरूड बु. : जाफराबाद तालुक्यातील वरूड बु. येथे मागील दोन महिन्यांपासून गावात ग्रामपंचायतच्या हद्दीत पाट्या लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. सोमवारी झालेल्या ग्रामसभेत या जागेवरील पाट्या काढण्याचा ठराव एकमुखी मंजूर करण्यात आला.
या प्रश्नावर यापूर्वी २१ मे रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. त्यांनी हा प्रश्न ग्रामसभेतच सोडविण्याच्या सूचना केली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी १० वाजता विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश गव्हाड हे होते. तर नायब तहसीलदार एस. टी .खंबाट, गटविकास अधिकारी अरूण चौलवार, सहायक गटविकास अधिकारी आर. एस. अहिरे, मंडळ अधिकारी एस. डी. भांदरगे, तलाठी व्ही. आर. इंगोले, ग्रामविस्तार अधिकारी के. एच. वनवे यांच्यासह उपसरपंच शोभा काळे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी माजी जि.प. सभापती रमेश पा. गव्हाड, जि.प. सभापती शीतल गव्हाड, पोलिस पाटील अनुभव जैन, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश करडेल, अजय देशमुख, लक्ष्मण साळवे, सुखदेव साळवे, अरूण साळवे, बाबूराव साळवे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
दरम्यान, यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक पी. बी. देशपांडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)