बालनाट्याने उडविली धमाल
By Admin | Updated: June 25, 2014 00:34 IST2014-06-25T00:05:02+5:302014-06-25T00:34:34+5:30
परभणी : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालयाच्या बालनाट्य स्पर्धेत दहा पारितोषिके मिळविलेल्या सर तुम्ही गुरुजी व्हा या नाटकाने सखीमंच व बालविकास मंचच्या सदस्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
बालनाट्याने उडविली धमाल
परभणी : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालयाच्या बालनाट्य स्पर्धेत दहा पारितोषिके मिळविलेल्या सर तुम्ही गुरुजी व्हा या नाटकाने सखीमंच व बालविकास मंचच्या सदस्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या नाटकाने रसिकांमध्ये धमाल उडविली.
२३ जून रोजी हरिप्रसाद मंगल भवन येथे सखीमंच व बालविकास मंचच्या वतीने या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन किरण सोनटक्के, प्रायोजक बालासाहेब घिके, सहप्रायोजक आचार्य कोचिंग क्लासेसचे बालाजी सुर्वे, विराज एंटरप्रायजेसच्या वैशाली विलास कौसडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. नृसिंह विद्या मंदिर पोखर्णीच्या नाट्य संघाने यावेळी त्र्यंबक वडसकर लिखित व दिग्दर्शित सर तुम्ही गुरूजी व्हा या नाटकाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचा अभिनय, नाटकातील गमती-जमती व शिक्षणाचे महत्त्व अनोख्या पद्धतीने साकारताच उपस्थित प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. शाळेमधील विद्यार्थी परीक्षार्थी की शिक्षणार्थी हा विषय पुढे घेत या नाटकाने रसिकांना खिळवून ठेवले.
या बालनाट्यात उषा भुमरे, अर्पिता वाघ, गीता कुलकर्णी, शामबाला बिरादार, गायत्री वाघ, भाग्यश्री भुमरे, शिवाणी गिरी, पूजा वाघ, पदमजा तारळकर, महेश सदगे, अनंत घायतिडक, साक्षी सोळंके, भारत इचनर, आकाश क्षीरसागर, महेश बोरकर, अनिल वाघ, शूभम सोळंके, उमाकांत बानायत या विद्यार्थ्यांच्या भूमिका होत्या. तर तंत्रज्ञ म्हणून रवी पुराणिक, शैलेश ढगे, डी. एन. जाधव, राम खरबे, प्रा. हनुमान व्हरगुळे, नागेश कुलकर्णी, मधुकर उमरीकर यांनी काम पाहिले. याच कार्यक्रमात बालविकास मंच अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती.
प्रायोजक संस्कृती विद्यानिकेतनच्या सरोज देसरडा व अबॅकस सेंटरचे अमोल जोशी यांच्या वतीने पारितोषिके देण्यात आली. अनुष्का वझूरकर, सुयश सोनटक्के, अंतरा मुक्कीरवार, भक्ती रामपूरकर, अदित्य जाधव, संस्कृती बासलवार यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
सखीमंच लक्की ड्रॉ सुनिता साडी सेंटरच्या सुनिता ताडकळसकर यांच्या वतीने लक्की विजेत्यांना साड्या भेट देण्यात आल्या. या कार्यक्रमास निताताई देशमुख, सविता अग्रवाल, लता वाजपेयी, संगीता महाजन, वंदना पवार, सविता संगेवार, उषा पातूरकर, अर्चना मामडे यांनी सहकार्य केले. यावेळी महिला व बाल सदस्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)