शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

‘अ‍ॅडमिशन फुल’; महापालिकेच्या 'या' शाळेत प्रवेश घेण्यासाठी लागतात चक्क रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 18:54 IST

सर्वसाधारणपणे खाजगी इंग्रजी शाळांच्या बाबतीत दिसणारे चित्र १९७० ची स्थापना असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या नारेगाव येथील शाळेत दिसते

ठळक मुद्दे शाळेतील मुलांची एकूण संख्या २५२५ असून, यापैकी १३२६ मुले आणि ११९९ मुली आहेत.शाळेतील बहुतांश मुले कष्टकरी वर्गातील आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावविज्ञान प्रदर्शन दरवर्षी 

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांच्या लागलेल्या रांगा आणि काही दिवसांतच ‘अ‍ॅडमिशन फुल’, ‘प्रवेश बंद’ अशा शाळेच्या प्रवेशद्वारावर झळकणाऱ्या पाट्या, हे सर्वसाधारणपणे खाजगी इंग्रजी शाळांच्या बाबतीत दिसणारे चित्र १९७० ची स्थापना असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या नारेगाव येथील शाळेत दिसू लागते, तेव्हा साहजिकच पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारतात. एकीकडे मनपाच्या इतर शाळा ओस पडत असताना या शाळेत दिसणारे चित्र मात्र साहजिकच सुखावणारे ठरते. 

नारेगावच्या महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता १ ली ते १० वी असे वर्ग चालतात. शाळेतील मुलांची एकूण संख्या २५२५ असून, यापैकी १३२६ मुले आणि ११९९ मुली आहेत. शाळेतील बहुतांश मुले कष्टकरी वर्गातील आहेत. ही मुले इतर मुलांच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत, यासाठी शिक्षकांकडून कसोशीने प्रयत्न केले जातात. यामुळेच सातत्याने दहावी बोर्डात शाळेच्या विद्यार्थ्यांचा निकाल उत्तम लागत असून, यामुळे दरवर्षी शाळेच्या विद्यार्थिसंख्येतही वाढ होते.

मुख्याध्यापक अंकुश लाडके म्हणाले की, शाळेत बहुसंख्य मुले अशी आहेत, जी बाहेर शिकवणी लावू शकत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनाच विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष द्यावे लागते. यासाठी आम्ही एक विशिष्ट पद्धत बनवली असून, याअंतर्गत एका शिक्षकाकडे १२ विद्यार्थी याप्रमाणे दहावीच्या मुलांची विभागणी केली आहे. हे शिक्षक आपल्या गटातील विद्यार्थ्यांचा अभ्यास, दर आठवड्याला त्यांची होणारी प्रगती याचा बरोबर आढावा घेतात. काही पालक मुलांना शाळेत नियमितपणे पाठवीत नाहीत. अशा पालकांना शाळेत बोलावून शिक्षक त्यांना समजावून सांगतात आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावनारेगाव शाळेतील मुले केवळ अभ्यासातच हुशार आहेत, असे नाही, तर या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, याकडे लक्ष दिले जाते. शहरात किंवा शहराबाहेर होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांना आवर्जून पाठविले जाते. त्यामुळे वक्तृत्व असो किंवा नृत्य, चित्रकला विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करावी लागते. याशिवाय शाळेत संगणक खोली आणि अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा असून, प्रत्येकाला विद्यार्थ्याला संगणक शिकविले जाते.

विज्ञान प्रदर्शन दरवर्षी नारेगाव माध्यमिक विद्यालयाचा असा नियम आहे, की शाळेचा दैनंदिन परिपाठ झाल्यावर एका वर्गाने एक विज्ञान प्रयोग सादर करायचा. यामुळे वर्षभर मुले या उपक्रमांतर्गत आपल्याला काय नवीन देता येईल याचा विचार करतात. त्यानंतर या प्रयोगांपैकी काही उत्तम प्रयोगांची निवड केली जाते आणि डिसेंबर-जानेवारी या काळात दरवर्षी एक विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात विद्यार्थी विज्ञान प्रयोग सादर करतात. यासाठी बाहेरच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही प्रयोग पाहण्यासाठी आमंत्रित केले जाते.

शाळेची इमारत आम्हाला पुरत नाही दोन वर्षांपासून आम्ही नववी आणि दहावीचे बाहेरून होणारे प्रवेश पूर्णपणे बंद केले आहेत. कारण आमचेच विद्यार्थी खूप आहेत. शाळेची इमारत अतिशय मोठी असूनही ती आम्हाला पुरत नाही. त्यामुळे आम्ही गावातील दुसरी जागादेखील घेतली असून, त्याठिकाणीही वर्ग भरवतो. शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची साथ यामुळे शाळेचा निकाल दरवर्षी उत्तम लागतो. यावर्षीही दहावीत आमचा विद्यार्थी ९५ टक्के नक्की घेणार, असा आम्हाला विश्वास आहे. - अंकुश लाडके, मुख्याध्यापक 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाStudentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षक