शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

प्रशासकांनी वाजवली रेड्डी कंपनीची ‘घंटी’; ११५ घंटागाड्या जानेवारीत येणार

By मुजीब देवणीकर | Updated: December 26, 2022 19:06 IST

शहराच्या विविध भागांत होत असलेल्या साफसफाईची पाहणी करीत असताना काही ठिकाणी घंटागाड्या कमी असल्याचे निदर्शनास आले.

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या रेड्डी कंपनीला रविवारी मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी चांगलेच धारेवर धरले. ११५ नवीन घंटागाड्या कधी येणार, सुपर वायजर कधी नेमणार, असा जाब विचारण्यात आला. कंपनीवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देताच कंपनीचे मुख्य अधिकारी मुरली रेड्डी यांनी जानेवारीत नवीन घंटागाड्या येतील, असे लेखी आश्वासन दिले.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानासाठी महापालिकेने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. मनपा प्रशासक डॉ. चौधरी, घनकचरा कक्षप्रमुख, उपायुक्त सोमनाथ जाधव हे सकाळपासूनच अभियानात सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागांत होत असलेल्या साफसफाईची पाहणी करीत असताना काही ठिकाणी घंटागाड्या कमी असल्याचे निदर्शनास आले.सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान सुरू असताना डॉ. चौधरी अचानक थांबले. रेड्डी कंपनीचे मुख्य संचालक मुरली रेड्डी त्या ठिकाणी आले.

रेड्डी यांना पाहताच चौधरी यांनी घंटागाड्या कधी वाढवणार, असा थेट प्रश्न केला. दोन महिन्यांपासून घंटागाड्या वाढविण्यासाठी सांगितल्यानंतरही आपण त्याकडे दुर्लक्ष करीत आहात, २९२ घंटागाड्या असल्या तरी आणखी ११५ घंटागाड्या कधी येतील, असे विचारत, स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती का केली नाही, कर्मचाऱ्यांना हँडग्लोव्हज, गमबूट का दिले नाहीत, त्यांना ड्रेस कधी देणार, अशी प्रश्नांची सरबत्ती रेड्डी यांच्यावर केली. प्रशासक संतप्त झाल्याचे पाहून रेड्डींची भंबेरी उडाली. त्यांनी कंपनीवर कारवाईचा इशारा दिला. रेड्डी यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घंटागाड्या वाढविल्या जातील, असे पत्र आयुक्तांना दिले. त्यानंतर प्रशासक तेथून निघून गेले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका