प्रशासनाची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:29 IST2017-10-07T00:29:46+5:302017-10-07T00:29:46+5:30

बीड : जिल्ह्यातील ६९० ग्रामपंचायतींपैकी ६५९ मतदान केंद्रावर शनिवारी मतदान होत आहे.

 Administrative gable | प्रशासनाची लगीनघाई

प्रशासनाची लगीनघाई

बीड : जिल्ह्यातील ६९० ग्रामपंचायतींपैकी ६५९ मतदान केंद्रावर शनिवारी मतदान होत आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळपासूनच अधिकारी, कर्मचा-यांची मतदान पेट्या घेऊन गावात मुक्कामी जाण्यासाठी लगीनघाई दिसून आली. पोलिसांचा मोठा फौजफाटा कर्मचा-यांसोबत बंदोबस्तासाठी रवाना झाला. जिल्ह्यातील १०३१ ग्रापंपैकी ६९० ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. पैकी ३१ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सदस्यपदाच्या ५८४४ जागांपैकी ७६९ जागा पूर्वीच बिनविरोध झाल्या. २७ जागांसाठी नामनिर्देशनपत्रेच दाखल झाली नाहीत. त्यामुळे आता ५ हजार ७५ जागांसाठी मतदान होणार आहे, तर ४८ ग्रापंमध्ये सरपंच बिनविरोध आला असून, आता ६४२ सरपंच पदासाठी मतदान होईल.
जिल्ह्यात २२२४ मतदान केंद्रे आहेत. पैकी ७९ केंद्रे ही अतिसंवेदनशील असून, १६८ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जिल्हा प्रशासनाने घोषित केली आहेत.
या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त पाठविण्यात आला आहे.

Web Title:  Administrative gable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.