शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

प्रशासकीय बनवाबनवी ! महामार्गालगतच्या जमिनी दाखवून वाटली १४० कोटीची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 1:03 PM

मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्ग २११ साठी झालेल्या भूसंपादनात वाटली खैरात

ठळक मुद्देऔरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये संशयास्पद व्यवहार हायवेलगत नसणाऱ्या ६ लाख ६७ हजार ३०५ चौ.मी जमिनीच्या संपादनासाठी वाटले पैसे

- विकास राऊत औरंगाबाद : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह खान्देशाला जोडणाऱ्या सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ (एनएच) च्या भूसंपादनात हायवेलगत जमिनी दाखवून १४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाटल्याची माहिती पुढे आली आहे. 

केंद्रीय दळणवळण खात्याने एनएच क्र.२११ हा प्रकल्प २०११-१२  मंजूर केला. यातील काही टप्प्यांचे काम अजून होणे बाकी आहे. असे असतानाच भूसंपादनातील संशयास्पद बाबी समोर येऊ लागल्या आहेत. विभागात हायवेलगत जमिनी दाखवून केलेल्या ११६ कोटी ६८ लाख रुपयांच्या भूसंपादनाबाबतही संशयास्पद चर्चा प्रशासकीय वर्तुळात होऊ लागली आहे. 

एनएच क्र.२११ या प्रकल्पामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये हायवेलगत नसणाऱ्या ६ लाख ६७ हजार ३०५ चौ.मी जमिनीच्या संपादनासाठी ११६.६८ कोटी रुपयांचा मावेजा देण्यात आला आहे. म्हणजेच हायवेलगत जमिनी दाखवून औरंगाबाद विभागात तत्कालीन भूसंपादन यंत्रणेने मोबदला दिल्याचे दिसते आहे. तो मोबदला देण्यासाठी एचएचआयसह नगररचना व इतर यंत्रणेने देखील मान्यता दिली आहे. 

महामार्गालगतचे  संशयास्पद भूसंपादन असे  औरंगाबाद जिल्हाऔरंगाबाद, पांढरी येथील गट.क्र. २२, २६, २३, २१, २०, १९, १८ मधील २० हजार ७० चौरस मीटर जमीन ३ कोटी ९३ लाख तर गट.क्र.२६ मधील ११९० चौ.मी.जमीन ५४ लाख ९० हजार देऊन संपादित करण्यात आली. पैठण तालुक्यात आडूळ बु.गट.क्र. २५२, २५४, १८९, १८८, १६१, १६०, १६२, १६३,२२, २०, १८, १७, १९, १६, १३, १५,१२,१४ मधील १ लाख ६ हजार ११० चौ.मी. जमीन १७ कोटी ९३ लाख व गट.क्र. १६२, १५, १२, २३, ३०, ३१, ३३, २५२ मधील ३० हजार १७० चौ.मी. जमिनीला ५ कोटी ८१ लाखांचा मावेजा दिला. आडूळ खु. गट.क्र.९४, ८९ मधील ६ हजार ३२० चौ.मी. जमीन ७७ लाख २८ हजार तर गट.क्र. ८९ मधील १७८० चौ.मी. जमीन २९ लाख ६६ हजारांत संपादित केली. रजापूर ता.पैठण गट.क्र. ८२, ८१, ७९, ८०, ७७, ४१, ४३, ४२  मध्ये ४७ हजार ७७० चौ.मी. जमीन ४ कोटी ९८ लाख तर गट.क्र.८२, ४१, ४२ मध्ये १ हजार ७९० चौ.मी. जमीन ३५ लाख २६ हजारांत संपादित केली. पाचोड गट.क्र. १५६, १५५, १५८, १५९, १६०, १६२, १७५, १७६, १८६, १८५, ७५, १८८, १८९, २२७, २२९, २२८, २३१, २३७, २३६, २९८, २९७, २९२, २८३, २७८, २७७ मधील २ लाख ३० हजार २०० चौ.मी.जमीन ३९ कोटी ११ लाखांत तर गट.क्र. १५८, १५५, ७५, २२७, २२८,२८०, २७९ मधील ९ हजार ७०० चौ.मी. जमीन २ कोटी ३० लाखांत संपादित केली.

जालना जिल्हाजि.जालना, शहागड, ता. अंबड गट.क्र. ६, ७ मधील २ हजार ५९० चौ.मी जमिनीला १ कोटी १५ लाख तर गट.क्र. ६, ७ मधील १२ हजार ४६० चौ.मी. जमीन ४ कोटी २४ लाखांत ताब्यात घेतली. 

उस्मानाबाद जिल्हाबासले (ता.वाशी) येथील गट.क्र. ९४, ८२, ७९, ७८ मधील ५५ हजार ३४५ चौ.मी. जमीन ९ कोटी ६१ लाखांत संपादित केली. 

बीड जिल्हाधोत्रा येथील गट.क्र. १४८,१४७, १४६, १४५, १४० मधील ३५ हजार ४०० चौ.मी जमीन ६ कोटी ६६ लाखांत,  चौसाळा गट.क्र.५३ १७ हजार २० चौ.मी. जमीन ३ कोटी ८१ लाखांत, समनापूर गट.क्र.११४, ११६ मधील १० हजार चौ.मी. जमीन ३ कोटी १० लाखांत तर गेवराई गट.क्र. २४३, ५६१ मधील १ हजार ८०० चौ.मी जमीन ७४ लाखांत, शिदोड गट.क्र. १०५, १०८, १०९, ११८, ११९, १२२, १४८ मधील ८८६० चौ.मी. जमीन १ कोटी ४७ लाखांत तर गट.क्र. ११७, ११८, ११९, १२२, १२३, १४८,१०९ मधील ६८ हजार ७३० चौ.मी. जमीन ९ कोटी ८७ लाखांत संपादित केली.

बीड, उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील ६ लाख ६७ हजार ३०५ चौ.मीटर जमिनीसाठी ११६ कोटी ६८ लाख रुपये तर औरंगाबादपासून पुढे काही भागातही असाच मावेजा देण्यात आला आहे. मागील तीन वर्षांपासून चर्चेत असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी येथील प्रकरण आता चौकशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. करोडी परिसरात २३ कोटींच्या आसपास रक्कम हायवेलगत जमिनी दाखवून वाटली आहे. ११६ कोटी ६८ लाख आणि ३५ कोटींचा एकत्रित विचार केला तर १४० कोटींहून अधिक रक्कम हायवेलगत जमिनी दाखवून वाटल्याचे दिसते आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गMarathwadaमराठवाडा