शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

औरंगाबादमध्ये पाणी पुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 3:34 PM

पाणीपुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा महापालिकेने, तर पर्यटनवृद्धीसह स्वयंरोजगार वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देपाणीपुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा महापालिके निर्धार पर्यटनवृद्धीसह स्वयंरोजगार वाढीसाठी जिल्हा प्रशासनाचा संकल्प

औरंगाबाद : पाणीपुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा महापालिकेने, तर पर्यटनवृद्धीसह स्वयंरोजगार वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन २०१८ या वर्षात करण्यात येणार्‍या संकल्पित विकास कामांची माहिती माध्यमांना देण्याच्या सूचना केल्या होत्या. शहराला पाणीपुरवठाच होत नाही, तर शहर कसे स्मार्ट होणार, यावर आयुक्त मुगळीकर म्हणाले, समांतरचे प्रकरण कोर्टात आहे. त्यातील अडचणी दूर होतील, योजना सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला; परंतु मनपाकडे स्वतंत्र काय व्यवस्था आहे, हे त्यांनी सांगितले नाही. शहराची गरज २२५ एमएलडी असून, १२५ एमएलडी पाणी येते. दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

महापालिकेचा संकल्प असाआयुक्त मुगळीकर म्हणाले, स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. २६ जानेवारीला सोलर सिस्टिमचे उद्घाटन होईल. १४८ कोटींचा एकात्मिक कार्यक्रम सुरू होईल. २ हजार सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट बसस्टॉप, ११७८ वायफाय स्पॉट हे सर्व ९ महिन्यांत पूर्णत्वास जाईल. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन स्मार्ट रोडवर सायकल ट्रॅक, हर्सूल तलाव परिसरात सायकल ट्रॅक केला जाईल. १५० सिटीबस घेण्यात येतील. ५५ हजार एलईडी बल्ब बसविण्यात येतील. इलेक्ट्रिक रिक्षा कचरा संकलनासाठी येतील. ५ इलेक्ट्रिक बससह १५० कोटींचे रस्ते केले जातील. भूमिगत गटार योजनेचे काम झाले आहे. नारेगाव कचरा डेपो कचरामुक्त करण्यात येईल. 

जिल्हा प्रशासनाचा संकल्पपाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येईल. मुद्रा योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. ४५८ कोटी रुपयांचा पर्यटन आराखडा अंतिम करून पर्यटनस्थळांचा विकास केला जाईल. घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास, गतिमान प्रशासन, प्लास्टिकमुक्त औरंगाबाद, स्वच्छ भारत अभियानावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केला. पर्यटनवृद्धीला प्राधान्य असेल. मार्च अखेरपर्यंत आराखडा मंजूर केला जाईल. समृद्धी महामार्ग भूसंपादन, आॅनलाईन फेरफार, मुद्रा योजनेकडे लक्ष देण्याचेही त्यांनी नमूद केले. शेततळे, गाळ काढणे, शेतकरी कर्जमुक्ती या विषयांवरही त्यांनी प्रकाश टाकला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद