प्रशासन फक्त पाडापाडीतच मग्न
By Admin | Updated: December 15, 2014 00:49 IST2014-12-15T00:40:18+5:302014-12-15T00:49:33+5:30
औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेचे परिसरातील समस्यांच्या निराकरणाकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना रस्ते, पाणी, वीजपुरवठा इ. प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.

प्रशासन फक्त पाडापाडीतच मग्न
औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेचे परिसरातील समस्यांच्या निराकरणाकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना रस्ते, पाणी, वीजपुरवठा इ. प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.
सातारा परिसरात तोडफोडीच्या कामात नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अधिकारी पुढे येत नाहीत. डास निर्मूलनासाठी आणलेली फॉगिंग मशीन १५ दिवसांपासून बंद आहे. नुकत्याच दोन दिवस झालेल्या पावसाने पुन्हा बहुतांश ठिकाणी पाण्याची डबकी तुंबली आहेत. ड्रेनेज लाईन चोकअप झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवतो. ग्रामपंचायतीमध्ये जाऊन किमान गाऱ्हाणी मांडणे सोपे होते; परंतु आता अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तोडफोडीत गुंतला असल्याने प्रश्नांचे निराकरण होत नसल्याची खंत. देवळाई रोडवरील दिशा घरकुल परिसरात ड्रेनेज लाईन चोकअप, पाण्याचे टँकर चुकूनही फिरकत नाही, औषध फवारणीवाले कर्मचारी करवसुलीसाठी फिरताना आढळतात.