'त्यांचं ठरलंय'?... आदित्य ठाकरेंना पुढच्या पाच वर्षात वाढवायची आहे 'उंची'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:01 IST2019-08-30T12:57:00+5:302019-08-30T13:01:29+5:30

जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात आहे

Aditya Thackeray wants to increase 'height' in next five years | 'त्यांचं ठरलंय'?... आदित्य ठाकरेंना पुढच्या पाच वर्षात वाढवायची आहे 'उंची'

'त्यांचं ठरलंय'?... आदित्य ठाकरेंना पुढच्या पाच वर्षात वाढवायची आहे 'उंची'

औरंगाबाद : जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे उपस्थितांना सर्वदूर दिसत नव्हते अशी तक्रार होताच आदित्य ठाकरे यांनी,'अरे बापरे..! आता काय करायचे' असे म्हणताच खाली बसलेल्या एका महिलेने, 'पुढच्या पाच वर्षात तुमची उंची वाढवायची आहे' असे विधान करताच आदित्य ठाकरे यांनीही, 'काकी बरोबर बोलतात, पुढच्या पाच वर्षात माझी उंची वाढवायची आहे' अशी उत्स्फूर्त दाद दिली. 

आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी शहरात दाखल झाली. सकाळी एका मेळाव्यास आदित्य ठाकरे यांनी एका मेळाव्यास संबोधित केले. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत आहे. मेळाव्यात महिलेने केलेल्या, तुमची 'उंची' वाढवायची आहे या विधानाला ठाकरे यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यामुळे आदित्य ठाकरे भविष्यात कशा पद्धतीने आपली 'उंची' वाढवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: Aditya Thackeray wants to increase 'height' in next five years