शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

पुढे पुढे पाहा काय होतंय..!, आदित्य ठाकरेंना नेमकं काय सुचवायचंय?

By मोरेश्वर येरम | Updated: January 16, 2021 16:28 IST

औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं आहे. 

ठळक मुद्देऔरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रियाऔरंगाबादच्या नामांतरणाला काँग्रेसने केला आहे विरोधसुभाष देसाई यांच्यानंतर आता आदित्य ठाकरेंचंही महत्वपूर्ण विधान

औरंगाबादऔरंगाबादच्या नामांतरणाच्या वादावरुन सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं आहे. 

"पुढे पुढे पाहा काय होतंय... महाविकास आघाडीचं एकमत करुनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच या शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही प्राधान्याने सोडवत आहोत", असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या या विधानाने औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्याला आणखी बळ मिळालं आहे. 

आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल वारंवार बोलत असतात पण त्यांनी या शहराच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगावं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.  

संभाजीनगरचा प्रस्ताव लवकरच- सुभाष देसाईऔरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा प्रस्ताव लवकरच महाविकास आघाडी सरकार आणणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. त्यामुळे नामांतरणाला काँग्रेसचा स्पष्ट विरोध असतानाही देसाई यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. "राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच औरंगाबादच्या नावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औरंगजेबाजाचा उल्लेख का करावा? संभाजी राजेंच्याच नावानं हे शहर ओळखलं जावं, अशी भूमिका स्वत: मुख्यमंत्र्यांनी याआधीही मांडली आहे", असं सुभाष देसाई म्हणाले. 

नामांतरणाचा वाद चिघळणारऔरंगाबादचे नामांतरण करण्याला काँग्रेसने स्पष्ट विरोध दर्शवला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट नकार दिलाय. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मात्र संभाजीनगर असं नामांतरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील वाद येत्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसSubhash Desaiसुभाष देसाई