रस्ते विकासासंदर्भात मंत्र्यांना दिली निवेदने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:39 IST2017-11-14T00:38:54+5:302017-11-14T00:39:10+5:30

सार्वजनिक बांधकाममंत्री व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी जिल्हा दौºयावर आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पक्ष, सामाजिक संघटना यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले. याबाबतचा आढावा...

Addressing ministers about the development of roads, the statement said | रस्ते विकासासंदर्भात मंत्र्यांना दिली निवेदने

रस्ते विकासासंदर्भात मंत्र्यांना दिली निवेदने

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सार्वजनिक बांधकाममंत्री व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी जिल्हा दौºयावर आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पक्ष, सामाजिक संघटना यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले. याबाबतचा आढावा...
मोहन फड यांनी दिले निवेदन
पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आ.मोहन फड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना जिंतूर-परभणी- गंगाखेड- पिंपळदरी, देऊळगाव-सेलू- पाथरी- सोनपेठ- परळी, परळी-गंगाखेड-पालम या तिन्ही रस्त्यांना केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले आहे. परंतु, यावर एकही काम सुरु नाही. त्यामुुळे या रस्त्यांची कामे सुरु करावीत. तसेच मानवत रोड ते हसनापूरपर्यंत रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव-सायखेडा-खडका- महातपुरी या रस्त्याच्या कामास मंजुरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर आ.मोहन फड यांची स्वाक्षरी आहे.
महसूल कर्मचारी संघटना
येथील महसूल कर्मचारी संघटनेच्या महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांचे निवेदन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. या निवेदनात परभणी तालुक्यात दोन विधानसभा मतदारसंघ येतात. तसेच परभणी तालुक्याचे क्षेत्रफळ हे मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यात यावे. सुधारित अकृतीबंद संबंधितांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, लिपीकाचे पदनाम महसूल सहाय्यक करण्यात यावे, कोतवाल कर्मचाºयांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निेवेदनावर नानासाहेब भेंडेकर, विजय मोरे, एस.डी.मुंडे, आर.बी.कवडे, दत्ता गिणगिणे, सुरेश पुंड, जगदीश दुधारे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
महसूल आयुक्तालयाची मागणी
विभागीय महसूल आयुक्तालय परभणीतच स्थापन करण्यात यावे, यासाठी आपण व्यक्तीश: प्रयत्न करावेत, अशी मागणी सुनिल घुले, प्रकाश फरकंडकर यांनी एका निवेदनाद्वारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. कृषी विद्यापीठाला केंद्रीय कृषी विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा, मुंबई -विशाखापटणम् हा महामार्ग आर्थिक कॉरेडोर म्हणून विकसित करण्यात यावा, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनावर सौरभ कुरुंदकर, कलीम शेख, प्रा.सागर शर्मा, अ‍ॅड.अशिष सोनी, गोपाल शर्मा, किर्तीकुमार बुरांडे, अ‍ॅड.मिलिंद भोगावकर, विष्णू सायगुंडे आदींची नावे आहेत.

Web Title: Addressing ministers about the development of roads, the statement said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.