अभिनेता सुमित राघवणने लाईव्ह फेसबुकवर दाखविली नाट्यगृहाची दूरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 23:40 IST2017-08-06T23:39:53+5:302017-08-06T23:40:06+5:30

औरंगाबाद शहरातील नागरिक ओरडून ओरडून थकल्यानंतर आता अभिनेता सुमित राघवणने स्थानिक नाट्यगृहांची अत्यंत दयनीय अवस्था फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवून प्रशासनाचा ढिसाळ कारभार जगासमोर मांडला.

Actor Sumit Raghavan reminisced live on the Facebook show | अभिनेता सुमित राघवणने लाईव्ह फेसबुकवर दाखविली नाट्यगृहाची दूरवस्था

अभिनेता सुमित राघवणने लाईव्ह फेसबुकवर दाखविली नाट्यगृहाची दूरवस्था

औरंगाबाद, दि. - शहरातील नाट्यगृहांची दूरवस्था शतदा समोरून आणूनही मनपा प्रशासन ढिम्म ते ढिम्मच! शहरातील नागरिक ओरडून ओरडून थकल्यानंतर आता अभिनेता सुमित राघवणने स्थानिक नाट्यगृहांची अत्यंत दयनीय अवस्था फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवून प्रशासनाचा ढिसाळ कारभार जगासमोर मांडला. शनिवारी (दि.६) एका नाटकाच्या प्रयोगानिमित्त ते शहरात आले होते. प्रयोग सुरू करण्यापूर्वी जेव्हा त्यांच्या नाटकाची टीम संत एकनाथ रंगमंदिरात पोहचली तेव्हा तुटलेल्या खुर्च्या, मोडलेला रंगमंच, अस्वच्छता, मेक-अप रुमची दूरवस्था, स्वच्छातागृहांची दुर्गंधी अशी विदारक स्थिती पाहून चकीतच झाली. नाटकाच्या रंगमंचाची झालेली विटंबना सहन न झाल्याने त्यांनी लागलीच तेथून फेसबुकवर या सर्व परिस्थितीचे चित्रण लाईव्ह दाखविण्यास सुरूवात केली.

तो म्हणतो, ह्यआम्ही कलाकार १२-१२ तास प्रवास करून येथो आलो आणि अशा ठिकाणी आम्हाला प्रयोग करावा लागत आहे. आमच्या महिला कलाकार तर मेक-अप रुममध्ये जाण्यासही तयार नाही एवढी वाईट स्थिती आहे. या व्हिडिओमध्ये मग तो दुभंगलेले स्टेज, कुशन निघालेल्या खुर्च्या, जिकडे-तिकडे पडलेला कचरा, भिंती व दरवाजा मागे थुंकलेले, स्वच्छतागृहातील अस्वच्छता दाखवतो.

संत एकनाथ रंगमंदिराला दुर्लक्षित नाट्यगृह संबोधून तो म्हणतो की, ह्यआम्ही जेव्हा येथील कर्मचाºयाला पडलेला कचरा दाखवला तेव्हा त्याने ह्ययावेळेला माणसे मिळत नाही, असे कारण सांगून कचरा उचलण्यास नकार दिला.ह्ण यापूर्वी प्रशांत दामले यांनी स्वत: झाडू मारून नाट्यगृहांच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधले होते. मध्यंतरी शहरातील नाट्यप्रेमी व कलाकारांनीसुद्धा एकत्र येऊन मनपाला नाट्यगृहांबाबत निवेदन दिले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

पुन्हा औरंगाबादमध्ये प्रयोग नाही!
ह्यअत्यंत गलिच्छ अशा या ठिकाणी काम करायला धाडस लागतेह्ण अशी उपाहासात्मक टीका करत
सुमित राघवण यांनी पुन्हा येथे प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला. आधीच शहरात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत नाही अशी ओरड केली जाते आणि त्यातही जर आता कलाकरांनी येथे न येण्याचा निर्णय घेतला तर शहराच्या नाट्यसंस्कृतीला मोठा धक्का बसेल, अशी भीती नाट्यरसिकांनी व्यक्त केली.

शिवसेनेवर साधला निशाणा
औरंगाबाद शहराच्या महापालिकेच्या गलथान कारभारावर टीका करण्यासोबतच त्याने शिवसेनेवरही ताशेरे ओढले. सत्ताधारी पक्षाने रंगभूमीकडे असे दुर्लक्ष करावे याबाबत त्याने आश्चर्य व्यक्त केले. नाट्यगृहाची दूरवस्था दाखवताना त्याने ह्यवाह रे वाह शिवसेनाह्ण अशी उपरोधाने टीका केली. ह्यमी कोणत्या पार्टीच्या विरोधात नाही, पण शेवटी सगळे सारखेच आहेतह्ण, असे त्याने फेसबुकवर कमेंट लिहिली. पालिका प्रशासन हा व्हिडिओ पाहतील आणि नाट्यगृहाकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा राघवण यांनी शेवटी व्यक्त केली.

सोशल मीडियात नाच्चकी
सुमित राघवणने शेअर केलेला हा व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियवर व्हायरल झाला. बातमी लिहितेपर्यंत तो ५८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून ९१३ जणांनी शेअरदेखील केला. संगीतकार कौशल इनामदार यांनी राघवण यांचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, सर्व नाट्यरसिकांनी एकत्र येऊन या विरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे. मुळात आपण सरकारी मेहरबानीवर अवलंबून न राहता पर्यायी रंगमंचांची निर्मिती करावी.

Web Title: Actor Sumit Raghavan reminisced live on the Facebook show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.