पालिकेकडून वाहनांवर कारवाई

By Admin | Updated: February 5, 2017 23:32 IST2017-02-05T23:28:29+5:302017-02-05T23:32:08+5:30

तुळजापूर : शहरातील भवानी रोडवरील ‘नो पार्किंग’ परिसरात वाहने उभा करणाऱ्या वाहनचालकांना रविवारी पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले़

Action on vehicles from the Municipal Corporation | पालिकेकडून वाहनांवर कारवाई

पालिकेकडून वाहनांवर कारवाई

तुळजापूर : शहरातील भवानी रोडवरील ‘नो पार्किंग’ परिसरात वाहने उभा करणाऱ्या वाहनचालकांना रविवारी पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले़ मुख्याधिकारी आयुषप्रसाद यांनी पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांसह अचानक कारवाई मोहीम हाती घेऊन १०३ वाहन चालकांकडून १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला़
शहरातील भवानी रोडवरील नो पार्किंग परिसरात दुचाकी, चारचाकी वाहने लावण्यात येत असल्याने भाविकांसह शहरातील नागरिकांना रस्त्यांनी पायी नीट चालत येत नव्हते़ तुळजापूर तीर्थक्षेत्र असल्याने मुख्य मार्गावर भाविकांची वर्दळ मोठया प्रमाणात आहे़ मात्र, मंदिराकडे जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील वाहने पादचाऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरत आहेत़ विशेषत: काही अनुचित प्रकार घडला तर या वाहनांमुळे अग्निशमन व रूग्णवाहिका नेण्यासाठीही अडचण निर्माण होत होती़ ही बाब लक्षात घेऊन पालिकेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रविवारी कारवाई मोहीम राबविली़ भवानी रोडवरील, मंदीर परिसरातील नो पार्किंग मधील ९८ दुचाकी व ५ चारचाकींच्या चालकांवर कारवाई करून १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला़ ही कारवाई पालिकेचे कर्मचारी कापसे, एम़आय़ शेख, साळुंखे, पोलीस कर्मचारी पोहेका एम़ डी़पाटील, कोकरे, पोहेका माने आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली़ कारवाईचे स्वागत होत असून, कारवाईनंतर रस्ते मोकळा श्वास घेत होते़ (वार्ताहर)

Web Title: Action on vehicles from the Municipal Corporation