गुडमॉर्निंग पथकाकडून आठ जणांवर कारवाई

By Admin | Updated: June 12, 2014 01:39 IST2014-06-12T01:08:34+5:302014-06-12T01:39:03+5:30

उस्मानाबाद :निर्मल भारत अभियानतर्गत निवडलेल्या गावामध्ये गुडमॉर्निंग पथकामार्फत उघड्यावर शौचास बसणाऱ्या आठ व्यक्तींना उघड्यावर शौचविधी करत असताना पकडण्यात आले

Action by the Gooding Squad | गुडमॉर्निंग पथकाकडून आठ जणांवर कारवाई

गुडमॉर्निंग पथकाकडून आठ जणांवर कारवाई

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील निर्मल भारत अभियान व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या गावामध्ये गुडमॉर्निंग पथकामार्फत उघड्यावर शौचास बसणाऱ्या अंबेहोळ येथील आवाड बापू जीवन, लोंढे नारायण बोधा, लोंढे शामराव बाळू, दत्तात्रय उद्धव डिसले, सुरेश लक्ष्मण गायकवाड, कादर हमीद पठाण, दशरथ दगडू झेंडे, वैजिनाथ काशीनाथ गायकवाड हा आठ व्यक्तींना उघड्यावर शौचविधी करत असताना पकडण्यात आले व ग्रामीण पोलीस ठाणे उस्मानाबादच्या ताब्यात देण्यात आले.
पथक प्रमुख तथा गटविकास अधिकार एन.के. गुप यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकार एन.एस. राठोड, बालविकास प्रकल्प अधिकार एस.डी. मेदणे, एम.एच. पवार, जे.यु. तपिसे, ग्रामसेवक व्ही.डी. ढोकणे यांन पोलीस पथकासह सकाळी ५.४५ वाजता ही कार्यवाही केली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद यांन एका पत्रकान्वये कळविले आहे.

Web Title: Action by the Gooding Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.