जुगाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: June 27, 2014 00:27 IST2014-06-27T00:22:10+5:302014-06-27T00:27:10+5:30
उस्मानाबाद : तिर्रट, कल्याण मटका खेळणाऱ्या-खेळविणाऱ्या पाच जुगाऱ्यांवर बुधवारी पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई केली़

जुगाऱ्यांवर कारवाई
उस्मानाबाद : तिर्रट, कल्याण मटका खेळणाऱ्या-खेळविणाऱ्या पाच जुगाऱ्यांवर बुधवारी पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई केली़ या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
उमरगा पोलिसांनी शहरात कल्याण नावाचा मटका खेळणाऱ्या-खेळविणाऱ्या मुक्या राम स्वामी, विठ्ठल तुळशीराम कांबळे (दोघे राग़ुंजोट) यांच्याविरूध्द कारवाई केली़ या कारवाईत १८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ तर शहरातीलच एका लॉजसमोर कल्याण नावाचा मटका खेळणाऱ्या-खेळविणाऱ्या सत्यानंद शेखर रेड्डी, महेबूब पाशा नदाफ, शांतकुमार बिलाल मादगड (सर्व रा़उमरगा) या तिघाविरूध्द कारवाई केली़ यावेळी ३५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात करून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)