शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा कोचिंग क्लासेसवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 15:29 IST

सहा ठिकाणी कोरोनासंदर्भात उपाय-योजना नसल्याचे व नियम पाळले जात नसल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देदिवसभरात ४३ शिकवण्यांची तपासणी करण्यात आली.शिकवण्यांप्रमाणेच नियम न पाळणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई केली जाणार आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग शहरात झपाट्याने वाढत आहे. नागरिक, खाजगी संस्थांकडून नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी मंगल कार्यालये व कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून तपासणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी सहा कोचिंग क्लासेस चालकांवर कारवाई करून २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल १५६ रुग्णांची भर पडली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेने नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमांसाठी फक्त ५० व्यक्तींना परवानगी असताना शेकडो जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहेत. शहरातील कोचिंग क्लासेस मध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटाझरचा वापर या नियमांचे पालन होते किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या पथकांमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

दिवसभरात ४३ शिकवण्यांची तपासणी करण्यात आली. यातील सहा ठिकाणी कोरोनासंदर्भात उपाय-योजना नसल्याचे व नियम पाळले जात नसल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पथक क्रमांक पाचने चार ठिकाणी कारवाया करून प्रत्येकी पाच हजारांचा तर पथक क्रमांक चारने एका शिकवणीकडून पाच हजार तर दुसऱ्याकडून एक हजार असा २६ हजारांचा दंड वसूल केल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

मंगल कार्यालयांना नोटिसाशिकवण्यांप्रमाणेच नियम न पाळणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार वॉर्डनिहाय मंगल कार्यालयांना ५० जणांची उपस्थिती ठेवणे अनिवार्य आहे. या ठिकाणी सुद्धा सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे बंधनकारक आहे. नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना नोटीस देऊन केल्या जात असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र