वीजचोरी करणाऱ्या ९४ जणांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:03 IST2021-08-21T04:03:27+5:302021-08-21T04:03:27+5:30

वाळूज महानगर : वाळूज परिसरात वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत परिसरात वीजचोरी करणाऱ्या ...

Action against 94 people for stealing electricity | वीजचोरी करणाऱ्या ९४ जणांविरुद्ध कारवाई

वीजचोरी करणाऱ्या ९४ जणांविरुद्ध कारवाई

वाळूज महानगर : वाळूज परिसरात वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत परिसरात वीजचोरी करणाऱ्या ९४ जणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारून त्यांना जवळपास ६ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

वाळूज सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, कमळापूर, नारायणपूर, घाणेगाव आदी ठिकाणी जवळपास २५ हजार घरगुती ग्राहक आहेत. या परिसरात अनेक जण आकडे टाकून वीजचोरी करीत असल्याने करीत विजेचा अधिक भार येऊन ट्रान्सफार्मर जळणे, वारंवार फ्युज उडणे आदी तक्रारी महावितरणकडे आल्या होत्या. महावितरणचे सहायक अभियंता प्रशांत खंडागळे, वायरमन विकास काळे, आनंद बरसावणे आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी अचानक भेटी देऊन वीजचोरांविरुद्ध कारवाई केली. आकडे टाकून वीजचोरी करणे, मीटरमध्ये छेडछाड व फेरफार करून वीजचोरी करणे, शेजाऱ्यांकडून वीज घेणे, थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित केलेला असताना परस्पर आकडे टाकून वीज घेणे आदी प्रकार समोर आले.

जोगेश्वरी, कमळापुरात मोठी कारवाई

या मोहिमेत जोगेश्वरीत ३१, कमळापूर ३०, वाळूज १३, नारायणपूर १२ व रांजणगावात ८ अशा एकूण ९४ ठिकाणी वीजचोरी पकडण्यात आली. त्यांना जवळपास ६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरणाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तंबीही देण्यात आली.

Web Title: Action against 94 people for stealing electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.